4 जून दिनविशेष
4 june dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

4 जून दिनविशेष

जागतिक दिन :

  • आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस

4 जून दिनविशेष - घटना :

  • 1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
  • 1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
  • 1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
  • 1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
  • 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
  • 2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.
  • वरीलप्रमाणे 4 जून दिनविशेष 4 june dinvishesh
4 june dinvishesh

4 जून दिनविशेष - जन्म :

  • 1738 : ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
  • 1904 : ‘भगत पुराण सिंह’ – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
  • 1910 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल्म’ – होव्हर्क्राफ्ट चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
  • 1915 : ‘मालिबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
  • 1936 : ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
  • 1946 : ‘एस.पी. बालसुब्रह्मण्यम’ – दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण यांचा जन्म.
  • 1947 : ‘अशोक सराफ’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.
  • 1959 : ‘अनिल अंबानी’ – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
  • 1975 : ‘अँजेलिना जोली’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1990 : ‘जेत्सुनपेमा वांग्चुक’ – भूतानची राणी यांचा जन्म.

4 जून दिनविशेष - मृत्यू :

  • 1918 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1947 : ‘पंडित धर्मानंद कोसंबी’ – बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
  • 1962 : ‘चार्ल्स विल्यम बीब’ – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ.अश्विन दासगुप्ता’ – इतिहासतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 2020 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1930)

4 जून दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस

आंतरराष्ट्रीय निष्पाप मुलांचा दिवस विक्टिम्स् ऑफ ॲग्रेशन हा वार्षिक दिवस साजरा केला जातो जो दरवर्षी 4 जून रोजी जगभरातील शारिरीक, मानसिक आणि भावनिक शोषणाला बळी पडणाऱ्या बालकांना भोगाव्या लागणा-या वेदनांची कबुली देण्यासाठी केला जातो. मुलांवरील सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा अंत करण्याच्या उद्दिष्टासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा वचनबद्ध करणे हे देखील एक प्रोत्साहन आहे.

हिंसेमुळे अनेकदा दीर्घकाळ टिकणारी शारीरिक आणि मानसिक हानी होते, जे प्रौढत्वापर्यंत पोहोचते आणिमुलांचा विकास खुंटतो, हे लक्षात घेता, U.N.O.D.C. असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर मुलांवरील हिंसाचारानंतरच्या परिणामांमुळे जगभरात दरवर्षी ट्रिलियनचे नुकसान होते.

जगातील इतर प्रत्येक संघर्षग्रस्त प्रदेशात आक्रमकता समाप्त करण्याचा आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा हा दिवस प्रयत्न करतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

4 जून रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 4 जून रोजी आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस  असतो.