6 डिसेंबर दिनविशेष
6 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- भारतीय होमगार्ड स्थापना दिन
6 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1768 : एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- 1877 : द वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले.
- 1897 : परवानाधारक टॅक्सीकॅब सुरू करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
- 1912 : नेफर्टिटी बस्टचा शोध लागला.
- 1917 : फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.
- 1921 : ब्रिटिश आणि आयरिश प्रतिनिधींनी लंडनमध्ये अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी केली.
- 1922 : अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एक वर्षानंतर, आयरिश मुक्त राज्य अस्तित्वात आले.
- 1946 : भारतीय होमगार्ड संघटनेची स्थापना झाली
- 1971 : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले
- 1978 : स्पेनने सार्वमताद्वारे 1978 च्या स्पॅनिश राज्यघटनेला मान्यता दिली.
- 1981 : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.
- 1999 : जर्मन टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर देण्यात आला.
- 2000 : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 2006 : नासाने मार्स ग्लोबल सर्वेअरने मंगळावर द्रव पाण्याची उपस्थिती दर्शविणारी छायाचित्रे उघड केली.
- वरीलप्रमाणे 6 डिसेंबर दिनविशेष 6 december dinvishesh
6 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1421 : ‘हेन्री (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 21 मे 1471)
- 1732 : ‘वॉरन हेस्टिंग्ज’ – भारताचे पहिले गव्हर्नर जनरल यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1818)
- 1823 : ‘मॅक्स मुल्लर’ – जर्मन विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑक्टोबर 1900)
- 1853 : ‘हरप्रसाद शास्त्री’ – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1931)
- 1861 : ‘नारायण वामन टिळक’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1919)
- 1916 : ‘जयराम शिलेदार’ – गंधर्व भूषण, मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1992)
- 1917 : ‘इरब रोबिन्स’ – बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 2008)
- 1923 : ‘वसंत सबनीस’ – लेखक व पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 2002)
- 1932 : ‘कमलेश्वर’ – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 2007)
- 1945 : ‘शेखर कपूर’ – अभितेने यांचा जन्म.
- 1948 : ‘सुचेता भिडे-चापेकर’ – भरतनाट्यम नृत्यांगना यांचा जन्म.
- 1950 : ‘निरूपमा राव’ – भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी यांचा जन्म.
- 1985 : ‘आर. पी. सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
- 1988 : ‘रवींद्र जडेजा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
- 1993 : ‘जसप्रीत बुमराह’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
- 1994 : ‘श्रेयस अय्यर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म
- वरीलप्रमाणे 6 डिसेंबर दिनविशेष 6 december dinvishesh
6 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1892 : ‘वर्नेर व्होंन सीमेन्स’ – सीमेन्स कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 13 डिसेंबर 1816)
- 1956 : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1891)
- 1971 : ‘कमलाकांत वामन केळकर’ – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1902)
- 1990 : ‘तुक़ू अब्दुल रहमान’ – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1903)
6 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
भारतीय होमगार्ड स्थापना दिन
भारतीय होमगार्ड स्थापना दिन (Indian Home Guard Raising Day) दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1946 साली होमगार्ड संघटनेची स्थापना झाली, ज्याचे उद्दिष्ट देशाच्या अंतर्गत सुरक्षेत आणि आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणे हे होते.
होमगार्ड ही एक स्वयंसेवी सुरक्षा संघटना आहे, जी नागरिकांना संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आपत्ती, आपत्ती निवारण, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, आणि आपत्कालीन परिस्थितीत होमगार्ड महत्त्वपूर्ण सेवा देतात. पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करताना ते समाजाच्या सुरक्षेसाठी निःस्वार्थपणे कार्य करतात.
या दिवशी होमगार्ड सदस्यांच्या समर्पणाचे कौतुक केले जाते. त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि परेड आयोजित केल्या जातात.
भारतीय होमगार्ड स्थापना दिन आपल्याला देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या कार्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रदान करतो. हा दिवस त्यांच्या धैर्य आणि निष्ठेचा सन्मान करण्याचा आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 6 डिसेंबर रोजी भारतीय होमगार्ड स्थापना दिन असतो.
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे