10 डिसेंबर दिनविशेष
10 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

10 डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • मानवी हक्क दिन

10 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1817 : मिसिसिपी अमेरिकेचे 20 वे राज्य बनले.
  • 1868 : लंडनच्या वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये पहिले ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
  • 1901 : आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूच्या पाच वर्षा नंतर स्टॉकहोममध्ये पहिला नोबेल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
  • 1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
  • 1916 : संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • 1932 : थायलंड एक घटनात्मक राजेशाही बनले.
  • 1948 : मानवी हक्क दिन, मानवाधिकार करारावर संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केली.
  • 1953 : ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
  • 1978 : इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1984 : युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने अत्याचाराविरुद्धच्या अधिवेशनाला मान्यता दिली.
  • 1991 : नुरसुलतान नजरबायेव यांनी कझाकस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली
  • 1996 : नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेची नवीन राज्यघटना जारी केली.
  • 1998 : अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रज्ञ प्रो. अमर्त्य सेन यांना देण्यात आले.
  • 2003 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील 35 वे शतक झळकावले.
  • 2014 : भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
  • वरीलप्रमाणे 10 डिसेंबर दिनविशेष 10 december dinvishesh

10 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1870 : ‘सर जदुनाथ सरकार’ – इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1958)
  • 1878 : ‘चक्रवर्ती राजगोपालचारी’ – स्वतंत्र पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1972)
  • 1880 : ‘श्रीपाद कृष्ण बेलवलकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1967 – पुणे)
  • 1908 : ‘हसमुख धीरजलाल’ – सांकलिया भारतीय पुरातत्वावेत्ते यांचा जन्म.
  • 1957 : ‘प्रेमा रावत’ – भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 10 डिसेंबर दिनविशेष 10 december dinvishesh

10 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1857 : ‘वीर नारायण सिंह’ – छत्तीसगड राज्याचे पहिले स्वातंत्र्यसैनिक, 10 डिसेंबर 1857 रोजी त्यांना रायपूरच्या जयस्तंभ चौकात फाशी देण्यात आली.
  • 1896 : ‘अल्फ्रेड नोबेल’ – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1833)
  • 1920 : ‘होरॅस डॉज’ – डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 मे 1868)
  • 1953 : ‘अब्दुल्ला यूसुफ अली’ – भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1872)
  • 1955 : ‘आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर’ – प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1894)
  • 1963 : ‘सरदार के. एम. पणीक्कर’ – इतिहास पंडित यांचे निधन. (जन्म : 3 जून 1895)
  • 1964 : ‘शंकर गणेश दाते’ – ग्रंथसूचीकार यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1905)
  • 1999 : ‘फ्रांजो तुुममन’ – क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 मे 1922)
  • 2001 : ‘अशोक कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 13 ऑक्टोबर 1911)
  • 2003 : ‘श्रीकांत ठाकरे’ – संगीतकार यांचे निधन.
  • 2009 : ‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे’ – लेखक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1938)
  • 2024 : ‘एसएम कृष्णा’ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

10 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

मानवी हक्क दिन

मानव हक्क दिन (Human Rights Day) दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1948 साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकारांची सार्वत्रिक जाहीरनामा (Universal Declaration of Human Rights) स्वीकारला, त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

मानव हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच मिळालेला अधिकार आहे, जो धर्म, जात, लिंग, भाषा किंवा राष्ट्रीयतेच्या आधारावर बदलत नाही. या अधिकारांमध्ये स्वातंत्र्य, समानता, शिक्षण, न्याय, आणि मानवी प्रतिष्ठा यांचा समावेश होतो.

मानव हक्क दिनाचा उद्देश जागतिक पातळीवर मानवाधिकारांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे हा आहे. विविध देशांमध्ये या दिवशी शैक्षणिक कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जातात.

मानव हक्क दिन आपल्याला मानवतेसाठी एकत्र येण्याची आणि प्रत्येकासाठी समतापूर्ण, न्याय्य, आणि सन्मानाने जगणारी व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देतो. आपल्या कृतीतून मानवाधिकारांचा सन्मान आणि रक्षण करणे हीच खरी आदरांजली आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन असतो.
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
इतर पेज