11 डिसेंबर दिनविशेष
11 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

11 डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

11 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1816 : इंडियाना हे अमेरिकेचे 19 वे राज्य बनले.
  • 1930 : सी.व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – जर्मनी आणि इटलीने युनायटेड स्टेट्सविरुद्ध युद्ध घोषित केले.
  • 1946 : युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, युनिसेफची स्थापना झाली.
  • 1967 : कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
  • 1972 : अपोलो 17 ही चंद्रावर उतरणारी सहावी आणि शेवटची अपोलो मोहीम ठरली.
  • 1994 : अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने चेचन्यामध्ये प्रवेश केला.
  • 2001 : चीन जागतिक व्यापार संघटनेत (WTO) सामील झाला.
  • 2006 : अंतराळवीर सुनिता विल्यम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर पोहोचली.
  • 2024 : संजय मल्होत्रा भारतीय रिजर्व बँकेचे 26 वे गवर्नर बनले
  • वरीलप्रमाणे 11 डिसेंबर दिनविशेष 11 december dinvishesh

11 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1843 : ‘रॉबर्ट कोच’ – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी 1905 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू : 27 मे 1910)
  • 1867 : ‘रजनीकांत बर्दोलोई’ – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1940)
  • 1882 : ‘सुब्रम्हण्यम भारती’ – तामिळ साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1921)
  • 1892 : ‘अयोध्या नाथ खोसला’ – पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण यांचा जन्म.
  • 1899 : ‘पुरूषोत्तम यशवंत देशपांडे’ – कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1909 : ‘नारायण गोविंद कालेलकर’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1915 : ‘मधुकर दत्तात्रय देवरस’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1996)
  • 1922 : ‘दिलीपकुमार’ – अभिनेते  यांचा जन्म.
  • 1925 : ‘राजा मंगळवेढेकर’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 1 एप्रिल 2006)
  • 1929 : ‘सुभाष गुप्ते’ – लेगस्पिनर यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 2002)
  • 1931 : ‘आचार्य रजनीश’ – यांचा जन्म. (मृत्यू : 19 जानेवारी 1990)
  • 1935 : ‘प्रणवकुमार मुखर्जी’ – भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1942 : ‘आनंद शंकर’ – प्रयोगशील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1999)
  • 1969 : ‘विश्वनाथन आनंद’ – भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 11 डिसेंबर दिनविशेष 11 december dinvishesh

11 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1783 : ‘रघुनाथराव पेशवा’ – यांचे निधन. (जन्म : 18 ऑगस्ट 1734)
  • 1971 : ‘मॉरिस मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1902)
  • 1987 : ‘गुरुनाथ आबाजी कुलकर्णी’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 10 जुलै 1923)
  • 1992 : ‘पं. महादेवशास्त्री जोशी’ – भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक यांचे निधन.
  • 1998 : ‘राष्ट्रकवी प्रदीप’ – यांचे निधन. (जन्म : 6 फेब्रुवारी 1915)
  • 2001 : ‘रामचंद्र नारायण दांडेकर’ – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 17 मार्च 1909)
  • 2001 : ‘मेन्झा चोना’ – झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1930)
  • 2002 : ‘नानाभॉय अर्देशीर पालखीवाला’ – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म : 16 जानेवारी 1920)
  • 2004 : ‘एम. एस. सुब्बुलक्ष्मी’ – भारतरत्न गायिका यांचे निधन.
  • 2013 : ‘शेख मुसा शरीफी’ – भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान यांचे निधन.
  • 2015 : ‘हेमा उपाध्याय’ – भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार यांचे निधन.

11 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस दरवर्षी 11 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्वतांचे महत्त्व, त्यांचे पर्यावरणीय योगदान, आणि तेथील जीवनशैलीचे संवर्धन याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. पर्वत क्षेत्रे ही जैवविविधतेचे खजिने असून ती शुद्ध पाणी, अन्नधान्य, आणि औषधी वनस्पतींचा मुख्य स्रोत आहेत.

पर्वतांमुळे हवामानाचा समतोल राखला जातो आणि जलस्रोतांचे संवर्धन होते. मात्र, प्रदूषण, अतिक्रमण, आणि हवामान बदलामुळे पर्वतांचे संवर्धन संकटात आले आहे. त्यामुळे पर्वतीय भागातील पर्यावरण आणि जीवनशैलीचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

या दिवसाचे उद्दिष्ट पर्वतांसाठी टिकाऊ विकासाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करणे आहे. पर्यटन, जैवविविधता, आणि स्थानिक समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी लोकांनी पर्वतांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे.

पर्वतांसाठी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्यांचे संवर्धन केल्यास आपले पर्यावरण सुदृढ राहील आणि नैसर्गिक संसाधनांचे भविष्य सुरक्षित होईल. पर्वतांचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

11 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस असतो.
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
इतर पेज