20 डिसेंबर दिनविशेष
20 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

20 डिसेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन

20 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1924 : ॲडॉल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
  • 1945 : मुंबई-बेंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
  • 1971 : झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती बनले.
  • 1994 : राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला.
  • 1995 : नाटोने बोस्नियामध्ये शांतता राखण्यास सुरुवात केली.
  • 1999 : पोर्तुगालने मकाऊ बेट चीनला परत केले.
  • 2010 : ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक अशोक केळकर, यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2019 : युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स ही 1947 पासून युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाची पहिली नवीन शाखा बनली
  • वरीलप्रमाणे 20 डिसेंबर दिनविशेष 20 december dinvishesh

20 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1868 : ‘हार्वे फायरस्टोन’ – फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1938)
  • 1890 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1967)
  • 1901 : ‘रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ’ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1967)
  • 1909 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2000)
  • 1940 : ‘यामिनी कृष्णमूर्ती’ – पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यांचा जन्म.
  • 1942 : ‘राणा भगवानदास’ – पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
  • 1945 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय वकील यांचा जन्म. (मृत्यू : 26 जुलै 2010)
  • वरीलप्रमाणे 20 डिसेंबर दिनविशेष 20 december dinvishesh

20 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1731 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंडचे महाराजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1649)
  • 1915 : ‘उपेंद्रकिशोर रे’ – भारतीय चित्रकार आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 मे 1863)
  • 1933 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1871)
  • 1956 : ‘संत गाडगे महाराज’ – यांचे निधन. (जन्म : 13 फेब्रुवारी 1876)
  • 1971 : ‘रॉय ओ. डिस्ने’ – द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1893)
  • 1993 : ‘वामन नारायण भट’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार यांचे निधन.
  • 1996 : ‘कार्ल सगन’ – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1934)
  • 1996 : ‘दगडू मारुती पवार’ – बलुतं कार दलित लेखक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1935)
  • 1998 : ‘बंगळुरू वेंकट रमण’ –  जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1912)
  • 2001 : ‘लेओपोल्ड सेडर सेन्घोर’ – सेनेगलचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1906)
  • 2010 : ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1926)
  • 2010 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1936)

20 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन

दरवर्षी 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांमध्ये ऐक्य, एकात्मता आणि परस्पर सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या प्रोत्साहनाने स्थापन झालेला हा दिवस, गरिबीचे निर्मूलन, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यांसाठी प्रयत्नशील राहण्याची आठवण करून देतो. विविधतेत एकता हीच मानवतेची खरी ओळख आहे. त्यामुळे आपल्याला धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक विविधतेला सामावून घेऊन समानतेची भावना जोपासणे महत्त्वाचे ठरते.

मानव ऐक्य ही गरिबी, भेदभाव, आणि असमानता दूर करण्यासाठी प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा अधिक चांगल्या आणि न्याय्य समाजाची उभारणी शक्य होते.

आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन आपल्याला परस्पर साहाय्य, सहकार्य, आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व समजावतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन मानवतेसाठी काम करणे, हाच या दिवसाचा उद्देश आहे. “एकतेतच आपली शक्ती आहे.”

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

20 डिसेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन असतो.
डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज