25 डिसेंबर दिनविशेष
25 december dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

25 डिसेंबर दिनविशेष

25 डिसेंबर दिनविशेष - घटना :

  • 1976: आय.एन.एस. विजयदुर्ग भारतीय नौदलात सामील झाले.
  • 1990: वर्ल्ड वाइड वेबची पहिली यशस्वी चाचणी.
  • 1991: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि युक्रेन सार्वमताच्या आधारे युनियनपासून वेगळे होणारा पहिला देश ठरला.
  • 2004:  कॅसिनी ऑर्बिटरने ह्युजेन्स प्रोब सोडले जे 14 जानेवारी 2005 रोजी शनीच्या चंद्र टायटनवर यशस्वीरित्या उतरले.
  • 2021: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप लाँच.
  • वरीलप्रमाणे 25 डिसेंबर दिनविशेष 25 december dinvishesh

25 डिसेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1642: ‘आयझॅक न्यूटन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर यांचा जन्म. (मृत्यू: 20 मार्च 1727)
  • 1821: ‘क्लारा बार्टन’ – अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1912)
  • 1861: ‘पण्डित मदन मोहन मालवीय’ – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 नोव्हेंबर 1946)
  • 1886: ‘बॅ. मुहम्मद अली जिना’ – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1948)
  • 1878: ‘लुई शेवरोलेट’ – शेवरले कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1941)
  • 1889: ‘लीला बेल वॉलेस’ – रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 1984)
  • 1911: ‘बर्न होगार्थ’ – अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 28 जानेवारी 1996 – पॅरिस, फ्रान्स)
  • 1916: ‘अहमद बेन बेला’ – अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 एप्रिल 2012)
  • 1918: ‘अन्वर सादात’ – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1981)
  • 1919: ‘नौशाद अली’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 मे 2006)
  • 1924: ‘अटलबिहारी वाजपेयी’ – भारताचे 10 वे पंतप्रधान आणि एक हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू:  16 ऑगस्ट 2018)
  • 1926: ‘डॉ. धर्मवीर भारती’ – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 सप्टेंबर 1997)
  • 1926: ‘चित्त बसू’ – संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 1997)
  • 1927: ‘पं. रामनारायण’ – सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1932: ‘प्रभाकर जोग’ – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार यांचा जन्म.
  • 1936: ‘इस्माईल मर्चंट’ – भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 25 मे 2005)
  • 1959: ‘रामदास आठवले’ – भारतीय कवी आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1972: ‘मेकाथोटी सुचरिता’ – भारतीय राजकारणी आणि आंध्र प्रदेशचे गृहमंत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 25 डिसेंबर दिनविशेष 25 december dinvishesh

25 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1949: ‘लिओन स्चलिंगर’ – वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 मे 1884)
  • 1957: ‘प्रा. श्रीपाद महादेव माटे’ – साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 2 सप्टेंबर 1886)
  • 1972: ‘चक्रवर्ती राजगोपालाचारी’ – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1878)
  • 1977: ‘चार्ली चॅपलिन’ – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 एप्रिल 1889)
  • 1989: ‘निकोला सीउसेस्कु’ – रोमेनियाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1918)
  • 1994: ‘ग्यानी झैलसिंग’ – भारताचे 7 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 5 मे 1916)
  • 1995: ‘डीन मार्टिन’ – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते यांचे निधन. (जन्म: 7 जून 1917)
  • 1998: ‘दत्तात्रय गोविंद खेबुडकर’ – नाटककार व दिग्दर्शक यांचे निधन.

ख्रिसमस

ख्रिसमस हा दरवर्षी 25 डिसेंबर रोजी जगभरात साजरा होणारा ख्रिश्चन धर्मीयांचा प्रमुख सण आहे. येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. हा दिवस प्रेम, आनंद, आणि एकतेचा संदेश देतो.

ख्रिसमसच्या निमित्ताने घरे, चर्च, आणि रस्ते रंगीबेरंगी प्रकाशांनी सजवले जातात. ख्रिसमस ट्री ही या सणाची खास ओळख आहे, ज्यावर आकर्षक सजावट केली जाते. कुटुंबे आणि मित्र-परिवार एकत्र येऊन गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतात. लहान मुलांसाठी सांता क्लॉज हा विशेष आकर्षणाचा भाग असतो, जो त्यांना भेटवस्तू देतो.

ख्रिसमस हा माणुसकी, दानशूरता, आणि सहकार्य यांचे प्रतीक मानला जातो. गरीब आणि गरजू लोकांना मदत करून समाजात सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो.

ख्रिसमस आपल्याला शांतता, आनंद, आणि प्रेमाचा संदेश देतो. या सणाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो.

डिसेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12 3 4 567
891011121314
15161718192021
22232425262728
293031    
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज