27 डिसेंबर दिनविशेष
27 december dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन
27 डिसेंबर दिनविशेष - घटना :
- 1911 : “जन गण मन”, भारताचे राष्ट्रगीत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रथम गायले गेले.
- 1918 : बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
- 1945 : 29 देशांनी एकत्रित जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन केले.
- 1945 : कोरिया देशाची फाळणी झाली.
- 1949 : 1949 – इंडोनेशियन राष्ट्रीय क्रांती : नेदरलँड्सने अधिकृतपणे इंडोनेशियन स्वातंत्र्याला मान्यता दिली. डच ईस्ट इंडीजचा शेवट.
- 1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो 8 प्रशांत महासागरात कोसळले, चंद्रावर प्रथम परिभ्रमण मोहिमेचा अंत झाला.
- 1975 : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत 372 कामगार ठार झाले.
- 1978 : 40 वर्षांच्या हुकूमशाहीनंतर स्पेन हे प्रजासत्ताक बनले.
- 2004 : मॅग्नेटर SGR-1806-20 वरील स्फोटातून झालेले विकिरण पृथ्वीवर पोहोचले. ग्रहावरील ओळखली जाणारी ही सर्वात तेजस्वी एक्स्ट्रासोलर घटना आहे.
- 2007 : पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
- वरीलप्रमाणे 27 डिसेंबर दिनविशेष 27 december dinvishesh
27 डिसेंबर दिनविशेष - जन्म :
- 1571 : ‘योहान्स केप्लर’ – जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1630)
- 1654 : ‘जेकब बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 1705)
- 1773 : ‘जॉर्ज केली’ – इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी यांचा जन्म.
- 1797 : ‘मिर्झा गालिब’ – उर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू : 15 फेब्रुवारी 1869)
- 1822 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1895)
- 1898 : ‘पंजाबराव देशमुख’ – विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 1965)
- 1927 : ‘नित्यानंद स्वामी’ – उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 2012)
- 1944 : ‘विजय अरोरा’ – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 2 फेब्रुवारी 2007)
- 1965 : ‘सलमान खान’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
- 1973 : ‘कन्नन सुंदरराजन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
- 1986 : ‘शैली एन फ्रेजर प्राईस’ – दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 27 डिसेंबर दिनविशेष 27 december dinvishesh
27 डिसेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1900 : ‘विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग’ – ब्रिटीश स्थापत्यशास्त्री यांचे निधन.
- 1923 : ‘गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल’ – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1832)
- 1949 : ‘भालकर भोपटकर’ – यांचे निधन.
- 1965 : ‘देवदत्त नारायण टिळक’ – मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक यांचे निधन.
- 1972 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – कॅनडाचे 14 वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1897)
- 1997 : ‘मालती पांडे-बर्वे’ – मराठी भावगीत गायिका यांचे निधन.
- 2002 : ‘प्रतिमा बरुआ-पांडे’ – आसामी लोकगीत गायिका यांचे निधन.
- 2007 : ‘बेनझीर भूट्टो’ – पाकिस्तानच्या पंतप्रधान यांची हत्या. (जन्म : 21 जून 1953)
- 2013 : ‘फारुख शेख’ – अभिनेता यांचे निधन.
27 डिसेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन
आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन दरवर्षी 27 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश साथीच्या आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर तयारी करण्याचे महत्त्व समजावणे आहे. साथीचे रोग मानवजातीसाठी गंभीर आव्हान असतात आणि त्यांचा परिणाम आरोग्य, अर्थव्यवस्था, आणि समाजावर होतो.
कोविड-19 महामारीने जगाला साथीच्या रोगांविरुद्ध प्रभावी तयारीची गरज अधोरेखित करून दिली. या दिवशी देश, आरोग्य संस्था, आणि लोकांमध्ये जनजागृती केली जाते, तसेच साथींच्या रोगांवर मात करण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवले जाते.
या दिवसाच्या निमित्ताने शास्त्रज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी, आणि धोरणकर्त्यांना भविष्यातील साथींचा सामना करण्यासाठी अधिक संशोधन, लसीकरण कार्यक्रम, आणि आरोग्यसेवा मजबूत करण्याचे आवाहन केले जाते.
आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन आपल्याला जागरूक राहून आरोग्यसुरक्षेसाठी योगदान देण्याची प्रेरणा देतो. या तयारीमुळे जागतिक स्तरावर साथींच्या रोगांचे संभाव्य धोके कमी करता येतात.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 27 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन असतो.