आजचा दिनविशेष
Aajcha dinvishesh
14 मार्च दिनविशेष 14 march dinvishesh

आजचा जागतिक दिन :
- पाय डे (Pi Day)
आजचा दिनविशेष - घटना :
- 1931 : पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’ मुंबईत प्रदर्शित झाला.
- 1954 : दिल्लीत साहित्य अकादमीची स्थापना झाली.
- 1967 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमीत हलविण्यात आले.
- 1988 : पाई डे प्रथम गणित उत्साहींनी साजरा केला. 1988 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी पाय डेची संकल्पना मांडली होती. (π= 3.14) ही पायची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- 1998 : सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.
- 2000 : कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
- 2001 : सिक्कीममधील आदिवासी समुदायातील चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
- 2010 : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला
- वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh

आजचा दिनविशेष - जन्म :
- 1874 : ‘आंतोन फिलिप्स’ – फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑक्टोबर 1951)
- 1879 : ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1955)
- 1899 : ‘के. सी. इर्विंग इर्विंग’ – ओईल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 डिसेंबर 1992)
- 1908 : ‘फिलिप व्हिन्सेंट’ – व्हिन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1979)
- 1931 : ‘प्रभाकर पणशीकर’ – ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 2011)
- 1933 : ‘मायकेल केन’ – ब्रिटिश अभिनेता यांचा जन्म.
- 1961 : ‘माईक लाझारीडीस’ – ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक यांचा जन्म.
- 1963 : ‘ब्रूस रीड’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1965 : अमीर खान – सुप्रसिद्ध अभिनेता यांचा जन्म.
- 1974 : ‘साधना सरगम’ – पार्श्वागायिका यांचा जन्म.
- 1972 : ‘इरोम चानू शर्मिला’ – भारतीय कवी यांचा जन्म.
- 1973 : ‘रोहित शेट्टी’ – भारतीय दिग्दर्शक आणि छायाकार यांचा जन्म.
- वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
मृत्यू :
- 1883 : ‘कार्ल मार्क्स’ – जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते यांचे निधन. (जन्म: 5 मे 1818)
- 1932 : ‘जॉर्ज इस्टमन’ – अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1854)
- 1963 : ‘जयनारायण व्यास’ – भारताचे प्रमुख स्वतंत्रता सेनानी, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री आणि ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे प्रसिद्ध नेता यांचे निधन.
- 1998 : ‘दादा कोंडके’ – अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1932)
- 2003 : ‘सुरेश भट’ – कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1932)
- 2010 : ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: 23 ऑगस्ट 1918)
- 2018 : इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1942)
- 2022 : स्टीफन अर्ल विल्हाइट – अमेरिकन संगणक शास्र्यज्ञ व GIF फोटो फॉरमेटचे निर्माते (जन्म 3 मार्च 1948)
आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
जागतिक दिन लेख :
पाय डे (Pi Day)
पाय डे हा प्रत्येक वर्षी १४ मार्च रोजी साजरा केला जातो, कारण या तारखेला (3/14) गणितीय स्थिरांक π (पाय) ची प्रारंभिक तीन अंक (3.14) दर्शवतात. पाय ही गणितातील एक महत्त्वाची संकल्पना असून ती वर्तुळाच्या परीघाचा त्याच्या व्यासाशी असलेला गुणोत्तर दर्शवते.
हा दिवस गणितप्रेमी, वैज्ञानिक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात साजरा करतात. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिती स्पर्धा, व्याख्याने आणि पायशी संबंधित प्रयोग आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी पाय (Pie) बेकिंग स्पर्धा देखील होतात, कारण “Pi” आणि “Pie” या शब्दांचे उच्चार समान आहेत.
पाय हा गणितात आणि अभियांत्रिकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. तो गणितीय समीकरणांमध्ये, अभियांत्रिकीमध्ये आणि भौतिकशास्त्रात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पाय डेच्या निमित्ताने आपण गणिताच्या जादूचा आनंद घ्यावा आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या गोष्टी शिकण्याचा संकल्प करावा
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
14 मार्च रोजी जागतिक दिन कोणते ?
- 14 मार्च रोजी पाय डे (Pi Day) असतो.

