10 ऑक्टोबर दिनविशेष
10 october dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

10 october dinvishesh

जागतिक दिन :

  • जागतिक मानसिक आरोग्य दिन

10 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :

  • 1846 : इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम लासेल यांनी नेपच्यूनचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन शोधला.
  • 1911 : चीनमधील किंग राजवंशाचा अंत.
  • 1913 : पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1942 : सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रेलियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – 800 जिप्सी बालकांना छळ छावणीत मारली गेली.
  • 1954 : श्याम ची आई या चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.
  • 1960 : विद्याधर गोखले यांच्या ‘सुवर्णतुला’ नाटकाचा प्रीमियर झाला.
  • 1964 : टोकियो, जपान येथे 18 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1967 : बाह्य अवकाश करार अंमलात आला.
  • 1970 : फिजीचे युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.
  • 1975 : पापुआ न्यू गिनी संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • 1998 : आदर्श सेन आनंद भारताचे 29 वे सरन्यायाधीश बनले
  • वरीलप्रमाणे 10 ऑक्टोबर दिनविशेष 10 october dinvishesh

10 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :

  • 1731 : ‘हेन्री कॅव्हेंडिश’ – हायड्रोजन आणि अरागॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 1810)
  • 1830 : ‘इसाबेला (दुसरी)’ – स्पेनची राणी यांचा जन्म.
  • 1844 : ‘बद्रुद्दिन तैय्यबजी’ – रा. काँग्रेसचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1871 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचा जन्म. (मृत्यू : 23 एप्रिल 1958)
  • 1877 : ‘विल्यम मॉरिस’ – मॉरिस मोटर्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1963)
  • 1899 : ‘श्रीपाद अमृत डांगे’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1991)
  • 1902 : ‘शिवराम कारंथ’ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 डिसेंबर 1997)
  • 1906 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 मे 2001)
  • 1909 : ‘नोशीरवान दोराबजी नगरवाला’ – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1998)
  • 1910 : ‘डॉ. द्वारकानाथ कोटणीस’ – हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक यांचा जन्म.
  • 1912 : ‘राम विलास शर्मा’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 2000)
  • 1916 : ‘डॉ. लीला मूळगावकर’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म.
  • 1954 : ‘रेखा’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म
  • वरीलप्रमाणे 10 ऑक्टोबर दिनविशेष 10 october dinvishesh

10 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1898 : ‘मणिलाल नथुभाई त्रिवेदी’ – अष्टपैलू लेखक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1858)
  • 1911 : ‘जॅक डॅनियल’ – जॅक डॅनियल चे संस्थापक यांचे निधन.
  • 1964 : ‘गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म : 9 जुलै 1925)
  • 1983 : ‘रुबी मायर्स’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री यांचे निधन.
  • 2000 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – श्रीलंकेच्या 6व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. (जन्म : 17 एप्रिल 1916)
  • 2005 : ‘मिल्टन ओबोटे’ – युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 2006 : ‘सरस्वतीबाई राणे’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म : 4 ऑक्टोबर 1913)
  • 2008 : ‘रोहिणी भाटे’ – कथ्थक नर्तिका यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1924)
  • 2011 : ‘जगजित सिंग’ – गझल गायक यांचे निधन. (जन्म : 8 फेब्रुवारी 1941)

10 ऑक्टोबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक मानसिक आरोग्य दिन

जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे, परंतु अजूनही समाजात मानसिक आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित केल्या जातात.

समाजाने मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करून, एकमेकांना आधार देणे आणि मदत करण्याचे महत्त्व लक्षात ठेवावे. मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना मदत मिळाली पाहिजे, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन असतो.
सोशल मिडिया लिंक
ऑक्टोबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
इतर पेज