19 ऑक्टोबर दिनविशेष
19 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

19 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 1216 : इंग्लंडचा राजा जॉन मरण पावला आणि त्याचा 9 वर्षांचा मुलगा हेन्री सिंहासनावर बसला.
- 1791 : स्वीडन आणि रशिया यांच्यात ड्रॉटनिंगहोमचा करार
- 1812 : नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोमधून माघार घेतली.
- 1914 : पहिले महायुद्ध : यप्रेसची पहिली लढाई सुरू झाली.
- 1933 : जर्मनी लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडला.
- 1935 : लीग ऑफ नेशन्सने, इथिओपियावर आक्रमण केल्याबद्दल इटलीवर आर्थिक निर्बंध लादले.
- 1944 : दुसरे महायुद्ध – युनायटेड स्टेट्सचे सैन्य फिलीपिन्समध्ये उतरले.
- 1956 : सोव्हिएत युनियन आणि जपानने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ऑगस्ट 1945 पासून अस्तित्त्वात असलेल्या दोन देशांमधील युद्धाची स्थिती अधिकृतपणे समाप्त केली.
- 1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाला देण्यात आले.
- 1974 : नियू ही न्यूझीलंडची स्वयंशासित वसाहत बनली.
- 1987 : युनायटेड स्टेट्स नेव्हीने ऑपरेशन निंबल आर्चर केले, पर्शियन गल्फमधील दोन इराणी तेल प्लॅटफॉर्मवर हल्ला.
- 1993 : पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप, GMRT प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ, प्रा. गोविंद स्वरूप यांना सर सी. व्ही. रमण पदक जाहीर.
- 1994 : रुद्र वीणा वादक उस्ताद असद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्काराने सन्मानित केले.
- 2000 : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारच्या गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2005 : सद्दाम हुसेनवर बगदादमध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू.
- वरीलप्रमाणे 19 ऑक्टोबर दिनविशेष 19 october dinvishesh
19 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1902 : ‘दिवाकर कृष्ण केळकर’ – कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1973 – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
- 1910 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1995)
- 1920 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
- 1922 : ‘शांता शेळके’ – मराठी कवी आणि लेखक यांचा जन्म.
- 1925 : ‘डॉ. वामन दत्तात्रय वर्तक’ – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2001)
- 1936 : ‘शांताराम नांदगावकर’ – गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुलै 2009)
- 1954 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2002)
- 1961 : ‘सनी देओल’ – अभिनेते यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 19 ऑक्टोबर दिनविशेष 19 october dinvishesh
19 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
- 1216 : ‘जॉन’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1166)
- 1934 : ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1864)
- 1937 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1871)
- 1986 : ‘समोरा महेल’ – मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1933)
- 1950 : ‘विष्णू गंगाधर केतकर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1887)
- 1995 : ‘सलमा बेग ऊर्फ कुमारी नाझ’ – बाल कलाकार व अभिनेत्री यांचे निधन.
- 2003 : ‘अलिजा इझेटबेगोविच’ – बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1925)
- 2011 : ‘कक्कणदन’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1935)