16 जुलै दिनविशेष
16 july dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

16 जुलै दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक सर्प दिन

16 जुलै दिनविशेष - घटना :

  • 622: 622ई.पुर्व : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली
  • 1661: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या
  • 1935: ओक्लाहोमा येथे जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले
  • 1945: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
  • 1951: ब्रिटनने नेपाळला स्वतंत्र घोषित केले.
  • 1965: इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या मॉन्ट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
  • 1969: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-11 अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1992: भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाल शर्मा यांची निवड झाली.
  • 1998: गुजरातमध्ये शाळेत प्रवेशाच्या वेळी मुलाच्या नावावर आईचे नाव ठेवण्याचा निर्णय.
  • 2015: शास्त्रज्ञांनी प्लूटो ग्रहाचे जवळचे फोटो प्रसिद्ध केले.
  • वरीलप्रमाणे 16 जुलै दिनविशेष 16 july dinvishesh
16 july dinvishesh

16 जुलै दिनविशेष - जन्म :

  • 1773: ‘सर जोशुआ रेनॉल्ड्स’ – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1792)
  • 1863: ‘द्विजेंद्रलाल रॉय’ -बंगाली नाटककार, कवी आणि संगीतकार यांचा जन्म (मृत्यू: 17 मे 1913)
  • 1909: ‘अरुणा आसीफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न (मरणोत्तर) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 1996)
  • 1913: ‘स्वामी शांतानंद सरस्वती’ – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 7 डिसेंबर 1997 – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
  • 1914: ‘वा. कृ. चोरघडे’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 30 नोव्हेंबर 1995)
  • 1917: ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 1978)
  • 1923: ‘के. व्ही. कृष्णराव’ – भूदल प्रमुख यांचा जन्म.
  • 1926: ‘इर्विन रोझ’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1939: ‘शृंगी नागराज’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 16 जुलै 2013)
  • 1943: ‘प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे’ – लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 2010)
  • 1968: ‘धनराज पिल्ले’ – भारतीय हॉकी पटू यांचा जन्म.
  • 1968: ‘लैरी सेन्जर’ – विकिपीडिया चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1973: ‘शॉन पोलॉक’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984: ‘कतरिना कैफ’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 16 जुलै दिनविशेष 16 july dinvishesh

16 जुलै दिनविशेष
16 july dinvishesh
मृत्यू :

  • 1342: ‘चार्ल्स (पहिला)’ – हंगेरीचा राजा यांचे निधन.
  • 1882: ‘मेरीटॉड लिंकन’ – अब्राहम लिंकन यांची पत्नी यांचे निधन.
  • 1986: ‘वासुदेव सीताराम बेंद्रे’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1894)
  • 1993: ‘उ. निसार हुसेन खाँ’ – रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक यांचे निधन.
  • 1994: ‘जुलियन श्वाइंगर’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन

16 जुलै दिनविशेष
16 july dinvishesh
जागतिक दिन लेख :

16 july dinvishesh
जागतिक सर्प दिन

जागतिक सर्प दिन दरवर्षी 16 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट सर्पांविषयी जनजागृती वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे आहे. साप हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत आणि कीटक नियंत्रित करण्यात मदत करतात. परंतु अज्ञान आणि भीतीमुळे अनेक ठिकाणी सापांना नाहक मारले जाते. या दिवशी शाळा, संस्था आणि पर्यावरण प्रेमी सर्पांचे महत्त्व, त्यांचे प्रकार आणि संरक्षणाचे उपाय याबद्दल कार्यक्रम घेतात. सर्पांबद्दल योग्य माहिती पसरवणे आणि त्यांना न मारता वाचवण्याचे संदेश देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

16 july dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

16 जुलै रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिन असतो.
जुलै दिनविशेष
सोमंबुगुशु
  12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज