17 ऑक्टोबर दिनविशेष
17 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
17 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 1831 : मायकेल फॅराडे यांनी इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शनची गुणधर्म प्रायोगिकरित्या सिद्ध केली.
- 1888 : थॉमस एडिसनने ऑप्टिकल फोनोग्राफ (पहिली फिल्म) साठी पेटंट दाखल केले.
- 1917 : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला.
- 1931 : माफिया डॉन अल कॅपोनला आयकर चोरीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
- 1933 : अल्बर्ट आइनस्टाईन नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आले.
- 1934 : प्रभातचा अमृतमंथन हा चित्रपट पुण्यातील प्रभात सिनेमात प्रदर्शित झाला.
- 1943 : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक रेल्वे पूर्ण झाली.
- 1956 : पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प अधिकृतपणे इंग्लंडमध्ये सुरू झाला.
- 1966 : बोत्सवाना आणि लेसोथो संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
- 1979 : मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 1994 : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.
- 1996 : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
- 1998 : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.
- वरीलप्रमाणे 17 ऑक्टोबर दिनविशेष 17 october dinvishesh
17 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1817 : ‘सर सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1898)
- 1869 : ‘पं. भास्करबुवा बखले’ – गायनाचार्य, भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1922)
- 1892 : ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1968)
- 1917 : ‘विश्वनाथ तात्यासाहेब कोर’ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1994)
- 1930 : ‘रॉबर्ट अटकिन्स’ – अटकिन्स आहार चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2003)
- 1947 : ‘सिम्मी गरेवाल’ चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका यांचा जन्म.
- 1955 : ‘स्मिता पाटील’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1986)
- 1965 : ‘अरविंद डिसिल्व्हा’ – श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1970 : ‘अनिल कुंबळे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 17 ऑक्टोबर दिनविशेष 17 october dinvishesh
17 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
- 1772 : ‘अहमदशाह दुर्रानी (दुराणी)’ – अफगणिस्तानचे राज्यकर्ता यांचे निधन.
- 1882 : ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1814)
- 1887 : ‘गुस्ताव्ह किरचॉफ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1824)
- 1906 : ‘स्वामी रामतीर्थ’ – जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी यांनी जलसमाधी घेतली. (जन्म : 22 ऑक्टोबर 1873)
- 1981 : ‘कन्नादासन’ – भारतीय लेखक, कवी आणि गीतकार यांचे निधन. (जन्म : 24 जून 1927)
- 1993 : ‘विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 12 मे 1907)
- 2008 : ‘रविन्द्र पिंगे’ – ललित लेखक यांचे निधन. (जन्म : 13 मार्च 1926)
- 2008 : ‘बेन व्हिडर’ – इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1923)
17 ऑक्टोबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जागतिक स्तरावर गरिबीच्या प्रश्नावर लक्ष वेधणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचे महत्त्व पटवून देणे.
गरिबी हा केवळ आर्थिक समस्यांचा विषय नसून त्यात आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी, आणि माणसाचे जीवनमान यांचा समावेश असतो. जगातील अनेक लोक अद्याप अत्यंत गरिबीत जगत आहेत, आणि त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मूलभूत साधने उपलब्ध नसतात.
2024 मध्ये या दिवसाची थीम “समता आणि समाजातील सर्वांचा समावेश” आहे. या अंतर्गत, सर्वसामान्य लोकांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शाश्वत विकास, समाजातील वंचित घटकांचा विकास आणि आर्थिक संधी निर्माण करणे यावर जोर दिला जातो.
या दिवसाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीने सरकारी धोरणे आणि जागतिक सहकार्य यांना प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे एक सुसंविधीत समाज घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
17 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 17 ऑक्टोबर रोजी गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस असतो.