2 ऑक्टोबर दिनविशेष
2 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
2 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 1909 : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना केली.
- 1925 : जॉन लोगी बेयर्ड यांनी पहिला दूरदर्शन संच दाखवला.
- 1955 : पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
- 1958 : गिनीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1967 : थुरगुड मार्शल हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती बनले.
- 1969 : आरबीआयने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त महात्मा गांधींची प्रतिमा आणि स्वाक्षरी असलेल्या 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी केल्या.
- 2006 : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर स्वत आत्महत्या केली.
- वरीलप्रमाणे 2 ऑक्टोबर दिनविशेष 2 october dinvishesh
2 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1847 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑगस्ट 1934)
- 1869 : ‘मोहनदास करमचंद गांधी’ – महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
- 1891 : ‘विनायक पांडुरंग करमरकर’ – पद्मश्री विजेते शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 1967)
- 1904 : ‘लालबहादूर शास्त्री’ – भारतरत्न यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1966)
- 1908 : ‘गंगाधर बाळकृष्ण सरदार’ – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 डिसेंबर 1988)
- 1927 : ‘पं. दिनकर कैकिणी’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 23 जानेवारी 2010)
- 1939 : ‘बुद्धी कुंदर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 2006)
- 1942 : ‘आशा पारेख’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 1948 : ‘पर्सिस खंबाटा’ – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 1998)
- 1968 : ‘याना नोव्होत्ना’ – झेक लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1971 : ‘कौशल इनामदार’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 2 ऑक्टोबर दिनविशेष 2 october dinvishesh
2 ऑक्टोबर दिनविशेष
2 october dinvishesh
मृत्यू :
- 1906 : ‘राजा रविवर्मा’ – चित्रकार याचं निधन. (जन्म : 29 एप्रिल 1848)
- 1927 : ‘स्वांते अर्हेनिअस’ – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ याचं निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1859)
- 1975 : ‘के. कामराज’ – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री याचं निधन. (जन्म : 15 जुलै 1903)
- 1985 : ‘रॉक हडसन’ – अमेरिकन अभिनेते याचं निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1925)
2 ऑक्टोबर दिनविशेष
2 october dinvishesh
जागतिक दिन लेख :
2 october dinvishesh
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, जो महात्मा गांधी यांच्या जयंतीचा दिवस आहे. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला शांतता आणि सहिष्णुतेचे महत्त्व पटवून दिले. या दिवसाचा उद्देश जगभरातील लोकांना अहिंसा आणि शांततेच्या तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसाचार न टाळता विचार, शब्द आणि कृतींमध्येही शांतता राखणे. या तत्त्वावर आधारित समाज अधिक समजूतदार, सहकार्यशील आणि शांततापूर्ण बनू शकतो. संघर्ष, युद्ध आणि तणावमुक्त जग निर्माण करण्यासाठी अहिंसेची शिकवण अत्यंत आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या निमित्ताने, जगभरात अहिंसेच्या संदेशाचा प्रचार केला जातो आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय असमानता सोडवण्यासाठी संवाद, सहकार्य आणि सहानुभूती यांचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले जाते. या दिवशी लोकांना गांधीजींच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले जाते आणि त्यांच्या तत्त्वांच्या अनुसरणावर भर दिला जातो.
2 october dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
2 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असतो.