25 जुलै दिनविशेष
25 july dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

25 जुलै दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस
  • आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस

25 जुलै दिनविशेष - घटना :

  • 306 : 306ई.पुर्व  : कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले.
  • 1648 : आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
  • 1837  : विल्यम कुक आणि चार्ल्स व्हीटस्टोन यांनी लंडनमध्ये इलेक्ट्रिकल टेलिग्राफचा पहिला व्यावसायिक वापर यशस्वीपणे दाखवला.
  • 1894 : पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
  • 1908 : किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
  • 1909 : लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
  • 1917 : कॅनडात आयकर लागू झाला.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
  • 1973 : सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
  • 1977 : नीलम संजीव रेड्डी – भारताचे सहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 1978 : जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
  • 1982 : ग्यानी झैल सिंग –  भारताचे सातवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 1984 : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
  • 1987 : रामस्वामी वेंकटरमण –  भारताचे आठवे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 1992 : स्पेनमधील बार्सिलोना येथे 25व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
  • 1992 : डॉ शंकरदयाल शर्मा – भारताचे नववे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 1994 : इस्त्राएल व जॉर्डनमधे 1948 पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
  • 1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
  • 1997 : के. आर. नारायणन – भारताचे दहावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 1999 : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
  • 2002 : ए पी जे अब्दुल कलाम – भारताचे अकरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 2007 : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी कार्यभार स्वीकारला
  • 2012 : प्रणव मुखर्जी – भारताचे तेरावे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 2017 : रामनाथ कोविंद – भारताचे 14वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • 2022 : द्रौपदी मुर्मू – भारताचे 15वे राष्ट्रपती यांनी कार्यभार स्वीकारला
  • वरीलप्रमाणे 25 जुलै दिनविशेष 25 july dinvishesh
25 july dinvishesh

25 जुलै दिनविशेष - जन्म :

  • 1109 : ‘अफोन्सो’ – पोर्तुगालचा राजा पहिला यांचा जन्म.
  • 1875 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 एप्रिल 1955)
  • 1919 : ‘सुधीर फडके’ – गायक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 2002)
  • 1922 : ‘वसंत बापट’ – कवी, वक्ते, कलावंत, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 2002)
  • 1929 : ‘सोमनाथ चटर्जी’ – भारतीय राजकारणी, लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1936 : ‘यूसुफ़ ख़्वाजा हमीद’ – भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1939 : ‘एस. रामदास’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1978 : ‘लुईझ जॉय ब्राऊन’ – जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 25 जुलै दिनविशेष 25 july dinvishesh

25 जुलै दिनविशेष - मृत्यू :

  • 306 : 306ई.पुर्व  : ‘कॉन्स्टान्शियस क्लोरस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1409 : ‘मार्टिन पहिला’ – सिसिलीचा राजा यांचे निधन.
  • 1880 : ‘गणेश वासुदेव जोशी’ – समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1828)
  • 1973 : ‘लुईस स्टिफन सेंट लोरें’ – कॅनडाचे 12वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1977 : ‘कॅ. शिवरामपंत दामले’ – महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक यांचे निधन.
  • 2012 : ‘बी. आर. इशारा’ – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म : 7 सप्टेंबर 1934)
  • 2015 : ‘आर. एस गवई’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1929)

25 जुलै दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस

जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन दरवर्षी 25 जुलै रोजी साजरा केला जातो. बुडण्याच्या घातक आणि दीर्घकालीन परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे कुटुंब आणि समाज या दोघांवरही जागृती करणे आणि ते टाळण्यासाठी जीवन वाचवण्याच्या मार्गांबद्दल माहिती देणे हा आहे. दरवर्षी अंदाजे 236,000 लोक बुडतात – हे सहसा 5 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ग्रामीण भागातील मुले आणि किशोरवयीन मुले शहरातील लोकांपेक्षा जास्त बुडतात.

आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस

इंटरनॅशनल रेड शू डे हा एक उत्साही आणि अर्थपूर्ण कार्यक्रम आहे जो अदृश्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी केलेल्या संघर्षांवर प्रकाश टाकतो. हा दिवस दयाळूपणा आणि सहानुभूतीला प्रोत्साहन देतो, एक असे जग तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जिथे अदृश्य आजार अधिक चांगल्या प्रकारे समजले जातात आणि मान्य केले जातात.

लाइम रोग, फायब्रोमायल्जिया आणि क्रॉनिक थकवा सिंड्रोम यांसारख्या रोगांकडे लक्ष वेधण्यासाठी सहभागी लाल शूज घालतात. लाल शूज उत्कटतेचे प्रतीक आहेत आणि या रुग्णांना दररोज येणाऱ्या आव्हानांबद्दल जागरुकता वाढवण्याची वचनबद्धता आहे.

 

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

25 जुलै रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 25 जुलै रोजी जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस असतो.
  • 25 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस असतो.