3 जुलै दिनविशेष
3 july dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
3 जुलै दिनविशेष - घटना :
- 1608 : सॅम्युअल बी. चॅम्पलेनने कॅनडातील क्विबेक शहराची स्थापना केली.
- 1850 : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला सुपूर्द केला.
- 1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा उघडली.
- 1855 : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
- 1884 : शेअर मार्केट मध्ये डाऊ जोन्स इंडेक्स लाँच झाला.
- 1886 : जर्मनीच्या कार्ल बेंझने यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
- 1890 : ओहायो हे अमेरिकेचे 43 वे राज्य बनले.
- 1928 : लंडनमध्ये पहिला रंगीत दूरदर्शन कार्यक्रम प्रसारित झाला.
- 1938 : मॅलार्ड स्टीम इंजिन 202 किमी प्रतितास वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही आहे.
- 1962 : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अल्जेरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
- 1998 : कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- 2000 : विमानवाहू युद्धनौका विक्रांतचे मुंबईच्या समुद्रातील सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
- 2001 : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- 2006 : एक्स. पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
- वरीलप्रमाणे 3 जुलै दिनविशेष 3 july dinvishesh
3 जुलै दिनविशेष - जन्म :
- 1683 : ‘एडवर्ड यंग’ – इंग्लिश कवी यांचे जन्म.
- 1838 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 1893)
- 1886 : ‘रामचंद्र दत्तात्रय रानडे’ – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1957)
- 1909 : ‘बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 22 मार्च 2004)
- 1912 : ‘श्रीपाद गोविंद नेवरेकर’ – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1977)
- 1914 : ‘दत्तात्रय गणेश गोडसे’ – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1992)
- 1918 : ‘व्ही. रंगारा राव’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1974)
- 1924 : ‘सेल्लप्पन रामनाथन’ – तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1924 : ‘अर्जुन नायडू’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1926 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 2009)
- 1951 : ‘सररिचर्ड हॅडली’ – न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1952 : ‘अमित कुमार’ – भारतीय गायक यांचा जन्म.
- 1952 : ‘रोहिनटन मिस्त्री’ – भारतीय कॅनेडियन लेखक यांचा जन्म.
- 1962 : ‘टॉम क्रूझ’ – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
- 1971 : ‘ज्युलियन असांज’ – विकीलीक्स चे संस्थापक यांचा जन्म.
- 1976 : ‘हेन्री ओलोंगा’ – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1980 : ‘हरभजन सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1984 : ‘भारती सिंग’ – भारतीय विनोदी कलाकार यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 3 जुलै दिनविशेष 3 july dinvishesh
3 जुलै दिनविशेष - मृत्यू :
- 1350 : ‘संत नामदेव’ – यांनी समाधी घेतली. (जन्म : 29 ऑक्टोबर 1270)
- 1933 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जम : 12 जुलै 1852)
- 1935 : ‘आंद्रे सीट्रोएन’ – सिट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1878)
- 1969 : ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1942)
- 1996 : ‘राजकुमार’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1926)
3 जुलै दिनविशेष - जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
आपल्यापैकी बहुतेकजण दररोज त्यांचा वापर करतात, आपण भेट देत असलेल्या जवळजवळ प्रत्येक किरकोळ विक्रेत्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्या. आम्ही किराणा सामानाची खरेदी करत असलो तर जवळजवळ हमी देऊ शकता की तुम्ही तुमच्या नवीन वस्तूंनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशवीने स्टोअरमधून बाहेर पडाल.
प्लास्टिक प्रदूषण ही एक जागतिक आपत्ती आहे आणि दुर्दैवाने ती मानवनिर्मित आहे. तुम्हाला माहिती आहे का की जागतिक स्तरावर अंदाजे 500 अब्ज प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात? जरा विचार करा की यापैकी किती पिशव्या संपूर्ण ग्रहावर कचरा पडतील. याचा पर्यावरणावर, वन्यजीवांवर आणि मानवी आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे.
तर आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस असल्यामुळे आज आपण संकल्प करूयात आणि प्लास्टिक चा वापर टाळूया.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
3 जुलै रोजी जागतिक दिन कोणते ?
- 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस असतो.
सोशल मिडिया लिंक
जुलै दिनविशेष
इतर पेज