5 ऑक्टोबर दिनविशेष
5 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- जागतिक शिक्षक दिन
5 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 1864 : तीव्र चक्रीवादळामुळे कोलकाता शहराचा नाश झाला, सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू झाला.
- 1877 : वायव्य युनायटेड स्टेट्समधील नेझ पेर्स युद्ध समाप्त झाले.
- 1910 : पोर्तुगालमधील राजेशाही संपली आणि ते प्रजासत्ताक बनले.
- 1948 : IUCN स्थापना
- 1948 : अश्गाबात भूकंपात सुमारे 110,000 लोकांचा मृत्यू झाला.
- 1955 : पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशीन टूल्स कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
- 1962 : डॉ. नो हा पहिला जेम्स बाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
- 1989 : मीरासाहेब फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
- 1995 : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला.
- 1998 : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
- वरीलप्रमाणे 5 ऑक्टोबर दिनविशेष 5 october dinvishesh
5 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1890 : ‘किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला’ – तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक यांचा जन्म.
- 1922 : ‘यदुनाथ’ – थत्ते लेखक, संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 1998)
- 1922 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 26 एप्रिल 1987)
- 1923 : ‘कैलाशपती मिश्रा’ – गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू : 3 नोव्हेंबर 2012)
- 1932 : ‘माधव आपटे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1936 : ‘वक्लाव हेवल’ – चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 2011)
- 1939 : ‘वॉल्टर वुल्फ’ – वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक यांचा जन्म.
- 1964 : ‘सरबिंदू मुखर्जी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1975 : ‘केट विन्स्लेट’ – ब्रिटीश अभिनेत्री यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 5 ऑक्टोबर दिनविशेष 5 october dinvishesh
5 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :
- 1927 : ‘सॅम वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1887)
- 1929 : ‘वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली’ – भारतीय पुजारि यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1876)
- 1981 : ‘भगवतीचरण वर्मा’ – पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1903)
- 1983 : ‘अर्ल टपर’ – टपरवेअर चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 28 जुलै 1907)
- 1990 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1905)
- 1991 : ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1904)
- 1992 : ‘बॅ. परशुराम भवानराव पंत’ – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री यांचे निधन.
- 1997 : ‘चित्त बसू’ – संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1926)
- 2011 : ‘स्टीव्ह जॉब्ज’ – अॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 फेब्रुवारी 1955)
5 ऑक्टोबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
जागतिक शिक्षक दिन
जागतिक शिक्षक दिन दरवर्षी 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो, जो शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. युनेस्कोने 1994 साली हा दिन स्थापन केला, जो 1966 च्या शिक्षकांच्या स्थितीवर केलेल्या शिफारशीच्या वार्षिक स्मरणार्थ आहे. या दिवशी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले जाते, कारण ते केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये जीवनातील मूल्ये आणि कौशल्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात, जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करतात. या दिवशी विविध देशांमध्ये शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते, जसे की कमी संसाधने, अल्प वेतन, आणि जास्त कामाचा ताण. प्रत्येक वर्षी या दिवसाचे वेगळे विषय असतात, जसे की शिक्षकांचे सशक्तीकरण, शिक्षणातील नवकल्पना, आणि समान संधी. हा दिवस शिक्षकांना सन्मानित करण्याचा आणि समाजाच्या प्रगतीत त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देण्याचा दिवस आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन असतो.