15 जुलै दिनविशेष
15 july dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

15 जुलै दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक युवा कौशल्य दिन

15 जुलै दिनविशेष - घटना :

  • 1662 : इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
  • 1674 : मुघल सरदार बहादूरशाह कोकलताश यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लूट रायगडावर जमा करण्यात आली.
  • 1926 : कुलाबा ते मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरीय बससेवा सुरू झाली.
  • 1927 : र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1955 : 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ घोषणेवर स्वाक्षरी केली.
  • 1955 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 1961 : स्पेनने स्त्री-पुरुषांसाठी समान हक्क स्वीकारले.
  • 1962 : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्था सुरू झाली.
  • 1996 : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1997 : पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2006 : ट्विटर हा प्लॅटफॉर्म सुरु झाला.
  • 2011 : भारताने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संचार उपग्रह GSAT-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या                 प्रक्षेपित केले.
  • 2014 : जागतिक युवा कौशल्य दिन
  • वरीलप्रमाणे 15 जुलै दिनविशेष 15 july dinvishesh
15 july dinvishesh

15 जुलै दिनविशेष - जन्म :

  • 1606 : ‘रेंब्राँ’ – डच चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1669)
  • 1611 : ‘मिर्झाराजे जयसिंग’ – जयपूर चे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1667)
  • 1903 : ‘के. कामराज’ – खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1975)
  • 1904 : ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर’ – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 2001)
  • 1905 : ‘चौधरी मुहंमद अली’ – पाकिस्तानचे 4थे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1980)
  • 1906 : ‘राम श्री मुगली’ – कन्नड भाषेतील लेखक यांचा जन्म.
  • 1917 : ‘नूरमोहंमद तराकी’ – अफगणिस्तानचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1979)
  • 1927 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 2010)
  • 1932 : ‘नरहर कुरुंदकर’ – भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 10 फेब्रुवारी 1982)
  • 1933 : ‘एम. टी. वासुदेवन’ – नायर भारतीय लेखक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1937 : ‘श्री प्रभाज जोशी’ – भारतीय पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 2009)
  • 1949 : ‘माधव कोंडविलकर’ – दलित साहित्यिक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 15 जुलै दिनविशेष 15 july dinvishesh

15 जुलै दिनविशेष - मृत्यू :

  • 1291 : ‘रुडॉल्फ (पहिला)’ – जर्मनीचा राजा यांचे निधन. (जन्म : 1 मे 1218)
  • 1542 : ‘डेल जिकॉन्डो’ – लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा यांचे निधन. (जन्म : 15 जून 1479)
  • 1904 : ‘अंतॉन चेकॉव्ह’ – रशियन कथाकार व नाटककार यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1860)
  • 1919 : ‘हर्मान एमिल फिशर’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1852)
  • 1953 : ‘भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस’ – ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1882)
  • 1967 : ‘नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व’ – गायक व नट यांचे निधन. (जन्म : 26 जून 1888)
  • 1979 : ‘गुस्तावोदियाझ ओर्दाझ’ – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1991 : ‘जगन्नाथराव जोशी’ – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते यांचे निधन.
  • 1998 : ‘ताराचंद परमार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1999 : ‘जगदीश गोडबोले’ – पर्यावरणवादी लेखक यांचे निधन.
  • 1999 : ‘इंदुताई टिळक’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2004 : ‘डॉ. बानू कोयाजी’ – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक यांचे निधन. (जन्म : 22 ऑगस्ट 1918)

15 जुलै दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक युवा कौशल्य दिन

2014 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला, तरुणांना रोजगार, सभ्य काम आणि उद्योजकतेसाठी कौशल्ये सुसज्ज करण्याचे धोरणात्मक महत्त्व साजरे करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या ग्रहावर आता पूर्वीपेक्षा जास्त तरुण आहेत! म्हणूनच प्रौढ जीवनात पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी आणि आधुनिक जगात भरभराटी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह तरुणांनी भविष्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे.

जागतिक युवा कौशल्य दिनाची स्थापना गरजेकडे लक्ष वेधून कमी सेवा असलेल्या तरुणांच्या चिंता दूर करण्यासाठी करण्यात आली.

युनायटेड नेशन्स यांनी या कार्यक्रमाचा उपयोग किशोरवयीन आणि तरुण लोक कामासाठी, रोजगारासाठी आणि कौशल्याने सुसज्ज आहेत याची खात्री करून घेण्याचे धोरणात्मक महत्त्व साजरे करण्यासाठी निर्णय घेतला.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

15 जुलै रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनअसतो.
सोशल मिडिया लिंक
जुलै दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031
इतर पेज