आजचा दिनविशेष
Aajcha dinvishesh

10 एप्रिल दिनविशेष 10 april dinvishesh

10 एप्रिल दिनविशेष

आजचा जागतिक दिन :

  • राष्ट्रीय भावंड दिन National Siblings Day
  • जागतिक होमिओपॅथी दिवस World Homeopathy Day

आजचा दिनविशेष - घटना :

  • 1889: भारतीय कलाकार, जिम्नॅस्ट, बलूनिस्ट, पॅराशूटिस्ट आणि देशभक्त रामचंद्र चॅटर्जी हे हॉट एअर बलून आणि पॅराशूटमधून उडणारे पहिले भारतीय नागरिक बनले.
  • 1912: टायटॅनिकने इंग्लंडमधील साउथॅम्प्टन बंदरातून आपला पहिला आणि अंतिम प्रवास सुरू केला.
  • 1917 : गांधी चंपारण्याला आगमन
  • 1955: जोहान साल्क यांनी पोलिओ लसीची पहिली यशस्वी चाचणी केली.
  • 1970: पॉल मॅककार्टनी यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांसाठी बीटल्समधून बाहेर पडण्याची घोषणा केली.
  • 1982 : भारताचा पहिला उपग्रह इनसॅट वन अवकाशात सोडण्यात आला.
  • 2001 : भारत व इराण या दोन देश दरम्यान तेहरान घोषणा पात्रांवर हस्ताक्षर करण्यात आले.
  • 2010 : पोलिश वायुसेनेचे Tu-154M स्मोलेन्स्क, रशियाजवळ क्रॅश झाले, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष लेक काझीन्स्की, त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवरांसह 96 लोकांचा मृत्यू झाला.
  • 2019 : इव्हेंट होरायझन टेलिस्कोप प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी M87 आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ब्लॅक होल ची( Black Hole) पहिली प्रतिमा जाहीर केली
  • वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh

आजचा दिनविशेष - जन्म :

  • 1755 : ‘डॉ. सॅम्युअल हानेमान’ – होमिओपॅथीचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1843)
  • 1843 : ‘रामचंद्र गुंजीकर’ – विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 1901)
  • 1847 : ‘जोसेफ पुलित्झर’ – हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1911)
  • 1880 : सर सी. वाय. चिंतामणी – वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुलै 1941)
  • 1894 : ‘घनश्यामदास बिर्ला’ – बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1983)
  • 1897 : ‘प्रफुल्लचंद्र सेन’ – भारतीय लेखापाल आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 1990)
  • 1901 : कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे यांचा जन्म. (मृत्यू: 3 मे 1971)
  • 1907 : ‘मो. ग. रांगणेकर’ – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1995)
  • 1917 : ‘जगजितसिंह लयलपुरी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 2013)
  • 1927 : ‘मनाली कल्लट’ तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1982)
  • 1931 : ‘किशोरी आमोणकर’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1952 : ‘नारायण राणे’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1986 : आयेशा आझमी टाकिया – अभिनेत्री यांचा जन्म
  • 1972 : ‘प्रेसिंड कासासुलु’ – स्काईप चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे आजचा दिनविशेष | aajcha dinvishesh
10 april dinvishesh

आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
मृत्यू :

  • 1317 : ‘संत गोरा कुंभार’ – समाधिस्थ झाले.
  • 1678 : ‘वेणाबाई’ – रामदास स्वामींची लाडकी कन्या यांचे निधन.
  • 1813 : ‘जोसेफ लाग्रांगे’ – इटालियन गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1736)
  • 1931 : ‘खलील जिब्रान’ – लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1883)
  • 1937 : ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर’ – ज्ञानकोशकार यांचे निधन. (जन्म: 2 फेब्रुवारी 1884)
  • 1949 : ‘बिरबल सहानी’ – पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1891)
  • 1965 : ‘डॉ. पंजाबराव देशमुख’ – स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री यांचे निधन. (जन्म: 27 डिसेंबर 1898)
  • 1995 : ‘मोरारजी देसाई’ – भारताचे 4थे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1896)
  • 2000 : डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर – संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1918)
10 april dinvishesh 2024

आजचा दिनविशेष
aajcha dinvishesh
जागतिक दिन लेख :

राष्ट्रीय भावंड दिन

राष्ट्रीय भावंड दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी बहीण-भावाचा किंवा भाऊ-बहिणीचा खास नातेसंबंध साजरा केला जातो. भावंड म्हणजे बालपणाची साथ, खेळाची मजा आणि अनेक आठवणींचा ठेवा. या दिवशी आपण आपल्या भावंडांबद्दलचे प्रेम, कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त करतो.

भावंडांमधील नातं हे सहसा प्रेम, विश्वास, मदतीचा हात आणि थोडा शरारती वाद याने रंगलेलं असतं. लहानपणापासूनच भावंडं एकमेकांचे खरे मित्र आणि मार्गदर्शक असतात. कोणत्याही कठीण प्रसंगी भावंडांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा वाटतो.

या दिवशी अनेकजण सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे फोटो, आठवणी आणि संदेश शेअर करतात. काही ठिकाणी विशेष भेटवस्तू दिल्या जातात किंवा एकत्र वेळ घालवला जातो.

राष्ट्रीय भावंड दिन आपल्याला आठवण करून देतो की, नातेसंबंध जपायला आणि एकमेकांबरोबर वेळ घालवायला वेळ काढणं खूप गरजेचं आहे. भावंडं म्हणजे आयुष्यभराची साथ!

जागतिक होमिओपॅथी दिवस

जागतिक होमिओपॅथी दिवस दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य म्हणजे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांचा जन्मदिन. त्यांनी “Like cures like” या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी प्रणालीची स्थापना केली.

होमिओपॅथी ही एक नैसर्गिक आणि सौम्य उपचार पद्धत आहे जी रोगाच्या मूळ कारणावर उपचार करते. तिच्यात रसायनांचा वापर कमी असून, साइड इफेक्ट्सही नगण्य असतात. ही प्रणाली शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकट करून आरोग्य सुधारते.

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त वैद्यकीय संस्था, रुग्णालये आणि शैक्षणिक केंद्रांमध्ये जनजागृती कार्यक्रम, मोफत तपासणी शिबिरे आणि परिसंवाद आयोजित केले जातात.

या दिवशी आपण होमिओपॅथीच्या महत्त्वाची जाणीव करून घेतो आणि तिच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करतो.

जगभरातील अनेक लोक होमिओपॅथीवर विश्वास ठेवतात, कारण ती सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय भावंड दिन असतो.
  • 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस असतो.
एप्रिल दिनविशेष
सोमंबुगुशु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज
aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष