13 ऑक्टोबर दिनविशेष
13 october dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
13 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :
- 54 : 54ई.पूर्व : 17 व्या वर्षी ‘निरो’ – रोमन सम्राट झाला.
- 1773 : चार्ल्स मेसियरने व्हर्लपूल गॅलेक्सी शोधली.
- 1884 : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त हे शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
- 1923 : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलहून अंकारा येथे हलवली.
- 1929 : पुण्यातील पार्वती देवस्थान दलितांसाठी खुले करण्यात आले.
- 1944 : दुसरे महायुद्ध – रेड आर्मीने लॅटव्हियाची राजधानी रिगा ताब्यात घेतली.
- 1946 : फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले.
- 1970 : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1976 : इबोला विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ डॉ. एफ. ए. मर्फी यांनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांवर घेतला.
- 1983 : अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिले सेल्युलर नेटवर्क लाँच केले.
- 2016 : मालदीवने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
- 2019 : केनियाच्या ब्रिगिड कोसगेईने, शिकागो मॅरेथॉनमध्ये 2 :14 :04 वेळेत महिला धावपटूसाठी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला
- वरीलप्रमाणे 13 ऑक्टोबर दिनविशेष 13 october dinvishesh
13 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :
- 1877 : स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू : 6 मे 1946)
- 1911 : ‘अशोक कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 2001)
- 1924 : ‘मोतीरु उदयम’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 31 मार्च 2002)
- 1925 : ‘मार्गारेट थॅचर’ – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 2013)
- 1936 : ‘चित्ती बाबू’ – भारतीय वीणा वादक आणि संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 9 फेब्रुवारी 1996)
- 1941 : ‘जॉन स्नो’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1943 : ‘पीटर सऊबर’ – सऊबर एफ 1 चे संस्थापक यांचा जन्म.
- 1948 : ‘नुसरत फतेह अली खान’ – पाकिस्तानी सूफी गायक यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑगस्ट 1997)
- वरीलप्रमाणे 13 ऑक्टोबर दिनविशेष 13 october dinvishesh
13 ऑक्टोबर दिनविशेष
13 october dinvishesh
मृत्यू :
- 1965 : ‘पॉल हर्मन’ – म्युलर डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1899 – ओल्टेन, स्वित्झर्लंड)
- 1240 : ‘रझिया सुलतान’ – दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान यांचे निधन.
- 1282 : ‘निचिरेन’ – जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक यांचे निधन. (जन्म : 16 फेब्रुवारी 1222)
- 1911 : ‘भगिनी निवेदिता’ – लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या यांचे निधन. (जन्म : 28 ऑक्टोबर 1867)
- 1938 : ‘ई. सी. सेगर’ – पॉपॉय कार्टून चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1894)
- 1945 : ‘मिल्टन हर्शे’ – द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1857)
- 1987 : ‘किशोर कुमार’ – तथा पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचे निधन. (जन्म : 4 ऑगस्ट 1929)
- 1995 : ‘डॉ. रामेश्वर शुक्ल’ – हिन्दी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 1 मे 1915)
- 2001 : ‘डॉ. जाल मिनोचर मेहता’ – कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक यांचे निधन.
- 2003 : ‘बर्ट्राम ब्रॉकहाउस’ – नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
13 ऑक्टोबर दिनविशेष
13 october dinvishesh
जागतिक दिन लेख :
13 october dinvishesh
जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस
आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी जनजागृती करणे आणि समाजाला अधिक सक्षम बनवणे. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, भूकंप, चक्रीवादळ, वणवे आणि दुष्काळ यामुळे मानवी जीवन, मालमत्ता आणि पर्यावरणावर मोठे नुकसान होते.
या दिवसाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सरकारे, संस्था, आणि नागरिक यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या योजना तयार करण्याचे महत्त्व पटवले जाते. 2024 च्या थीमनुसार, “आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना”, यामध्ये तांत्रिक उपाय, शाश्वत बांधकाम आणि सामुदायिक सहभाग महत्त्वाचे मानले जाते.
आपत्ती धोका कमी करण्यासाठी वेळेवर उपाययोजना, आपत्कालीन तयारी, आणि पुनर्बांधणी यांचा समावेश होतो. या दिवसाचे उद्दिष्ट लोकांना सुरक्षित आणि सुदृढ जीवन देण्याच्या दिशेने काम करणे आहे, जेणेकरून आपत्तींचा धोका कमी होऊन मानवतेवर त्याचा परिणाम कमी होईल.
13 october dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
13 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 13 ऑक्टोबर रोजी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस असतो.