27 ऑक्टोबर दिनविशेष
27 october dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

27 october dinvishesh

जागतिक दिन :

  • दृकश्राव्य हेरिटेजसाठी जागतिक दिवस

27 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :

  • 1954 : बेंजामिन ओ. डेव्हिस, जूनियर हे युनायटेड स्टेट्स हवाई दलातील पहिले आफ्रिकन-अमेरिकन जनरल बनले.
  • 1958 : पाकिस्तानात जनरल अयुब खान यांनी लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
  • 1961 : नासाने मिशन सॅटर्न-अपोलो 1 मध्ये पहिल्या सॅटर्न I रॉकेटची चाचणी घेतली.
  • 1961 : मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत मध्ये प्रवेश.
  • 1971 : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे नाव बदलून झैरे ठेवण्यात आले.
  • 1979 : सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986 : युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारावरील सर्व निर्बंध उठवले.
  • 1991 : तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले
  • वरीलप्रमाणे 27 ऑक्टोबर दिनविशेष 27 october dinvishesh

27 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :

  • 1858 : ‘थिओडोर रुझव्हेल्ट’ – अमेरिकेचे 26 वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1919)
  • 1874 : ‘ भास्कर रामचंद्र तांबे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 7 डिसेंबर 1941)
  • 1904 : ‘जतिंद्रनाथ दास’ – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1929)
  • 1920 : ‘के. आर. नारायणन’ – भारताचे 10वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 9 नोव्हेंबर 2005)
  • 1923 : ‘अरविंद मफतलाल’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 30 आक्टोबर 2011)
  • 1947 : ‘डॉ. विकास आमटे’ – समाजसेवक यांचा जन्म.
  • 1954 : ‘अनुराधा पौडवाल’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
  • 1964 : ‘मार्क टेलर’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘मनीत चौहान’ – भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक यांचा जन्म.
  • 1977 : ‘कुमार संगकारा’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984 : ‘इरफान पठाण’ – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 27 ऑक्टोबर दिनविशेष 27 october dinvishesh

27 ऑक्टोबर दिनविशेष
27 october dinvishesh
मृत्यू :

  • 1605 : ‘अकबर’ – तिसरा मुघल सम्राट यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1542)
  • 1795 : ‘सवाई माधवराव’ – पेशवा यांचे निधन. (जन्म : 18 एप्रिल 1774)
  • 1937 : ‘उस्ताद अब्दुल करीम खाँ’ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1872)
  • 1964 : ‘वैकुंठ मेहता’ – सहकारी चळवळीचे प्रवर्तक यांचे निधन. (जन्म : 26 ऑक्टोबर 1891)
  • 1974 : ‘रामानुजम’ – गणिती चक्रवर्ती यांचे निधन. (जन्म : 9 जानेवारी 1938)
  • 1987 : ‘विजय मर्चंट’ – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक यांचे निधन. (जन्म : 12 ऑक्टोबर 1911)
  • 2001 : ‘प्रदीप कुमार’ – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1925)
  • 2001 : ‘भास्कर रामचंद्र भागवत’ – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक यांचे निधन. (जन्म : 31 मे 1910)
  • 2007 : ‘सत्येन कप्पू’ – हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता यांचे निधन.
  • 2015 : ‘रानजीत रॉय चौधरी’ – भारतीय औषधीशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1930)

27 ऑक्टोबर दिनविशेष
27 october dinvishesh
जागतिक दिन लेख :

27 october dinvishesh
जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन

जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन (World Day for Audiovisual Heritage) दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे दृश्य-श्राव्य माध्यमांद्वारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करणे आणि त्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे. दृश्य-श्राव्य वारशात चित्रपट, ध्वनिमुद्रण, रेडिओ कार्यक्रम, दूरदर्शन शो, आणि डिजिटल मीडिया यांचा समावेश होतो, ज्याद्वारे विविध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक घटना यांचे दस्तावेजीकरण होते.

ही माध्यमे आपल्या इतिहासाचा आणि ओळखीचा एक मौल्यवान भाग आहेत, परंतु त्यांची संवर्धन प्रक्रिया अवघड असू शकते, कारण वेळ, तांत्रिक समस्या, आणि योग्य साधनांच्या अभावामुळे ती धोक्यात येऊ शकतात. या दिवशी, अनेक संस्था आणि संग्रहालये दृश्य-श्राव्य सामग्रीचे महत्त्व अधोरेखित करून त्यांच्या जतनाच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतात.

जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिनाच्या निमित्ताने, सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी जागतिक स्तरावर असलेल्या धोरणांवर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या अमूल्य माहितीचे संरक्षण कसे करता येईल यावर भर दिला जातो.

27 october dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

27 ऑक्टोबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 27 ऑक्टोबर रोजी जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिनअसतो.
ऑक्टोबर दिनविशेष
सोमंबुगुशु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज