27 फेब्रुवारी दिनविशेष
27 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- मराठी भाषा गौरव दिन
27 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1594: हेन्री चौथा फ्रान्सचा राजा झाला.
- 1844: डोमिनिकन रिपब्लिकला हैतीपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1900: ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
- 1940: मार्टिन कामेन आणि सॅम रुबेन यांनी कार्बन-14 चा शोध लावला.
- 1967: डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 2001: चांदीपूर तळावर जमिनीपासून आकाशापर्यंत अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या स्वदेशी विकसित आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
- 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला
- वरील प्रमाणे 27 फेब्रुवारी दिनविशेष | 27 february dinvishesh
27 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी यांचा जन्म(मृत्यू: 10 मार्च 1999)
- 1925: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 14 फेब्रुवारी 2023)
- 1926: ‘ज्योत्स्ना देवधर’ – मराठी व हिन्दी लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2013)
- 1932: ‘एलिझाबेथ टेलर’ – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 2011)
- 1986: ‘संदीप सिंग’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 27 फेब्रुवारी दिनविशेष | 27 february dinvishesh
27 फेब्रुवारी दिनविशेष
27 february dinvishesh
मृत्यू :
- 1892: ‘लुई वूत्तोन’ – फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1821)
- 1894: ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 जून 1822)
- 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक यांचे निधन.
- 1931: ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांनी प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: 23 जुलै 1906)
- 1956: ‘गणेश वासुदेव मावळणकर’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1888)
- 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक यांचे निधन.
- 1997: ‘श्यामलाल बाबू राय’ – गीतकार यांचे निधन.
- 2010: ‘नानाजी देशमुख’ – भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
- 2012: ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1929)
27 फेब्रुवारी दिनविशेष
27 february dinvishesh
जागतिक दिन लेख :
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषेतील अजरामर कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाने पाळला जातो. कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव वाढवला आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.
मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून ते अगदी आजच्या साहित्यिकांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेची महती वाढवली आहे. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि संतवाङ्मय यामुळे ही भाषा अधिक समृद्ध झाली आहे.
या दिवशी विविध शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये भाषण, निबंध स्पर्धा, कविता वाचन आणि नाट्यप्रयोग आयोजित केले जातात. याचा उद्देश तरुण पिढीमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे आणि तिचा सन्मान राखणे हा आहे.
गेल्या काही वर्षांत इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, तिचा जास्तीत जास्त वापर करावा आणि तिचे संवर्धन करावे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन असतो.