आजचा दिनविशेष
Aajcha dinvishesh
20 जानेवारी दिनविशेष 20 january dinvishesh
जानेवारी दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
- 1841: युनायटेड किंग्डमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
- 1937: फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट यांनी अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 20 जानेवारी रोजीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याची परंपरा लागू झाली.
- 1944: दुसऱ्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर 2,300 टन बॉम्ब टाकले.
- 1957: पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आशियातील पहिला अणुभट्टी देशाला समर्पित केला आणि अणुऊर्जा प्रतिष्ठान (आता भाभा अणु संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते) स्थापन करण्यात आले.
- 1963: चीन आणि नेपाळमध्ये सीमा करार झाला.
- 1969: क्रॅब नेब्युलामध्ये पल्सरचे प्रथम निरीक्षण.
- 1998: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
- 1999: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
- 2009: बराक ओबामा अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष झाले, ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
- 2017: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
- 2021: जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
- वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष - जन्म :
- 1775: ‘आंद्रे-मरी अॅम्पियर’ – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 जून 1836)
- 1861: ‘काशीबाई गोविंदराव कानिटकर’ – मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक यांचा जन्म.
- 1871: ‘सर रतनजी जमसेटजी टाटा’ – टाटा घराण्यातील उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1918)
- 1889: ‘मसुरकर महाराज’ – महान देशभक्त आणि तपस्वी यांचा जन्म.
- 1926: ‘विटाली व्होरोत्निकोव्ह’ – रशिया देशाचे 27वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 19 फेब्रुवारी 2012)
- 1930: ‘बझ आल्ड्रिन’ – चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
- 1940: ‘कृष्णम राजू’ – भारतीय अभिनेते आणि खासदार यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 2022)
- 1940: ‘मांडे सिदिबे’ – माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2009)
- 1945: ‘अजित कुमार डोवाल’ – भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा जन्म.
- 1960: ‘आपा शेर्पा’ – 19 वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक यांचा जन्म.
- 1994: ‘अक्षर राजेशभाई पटेल’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष - मृत्यू :
- 1745: ‘चार्ल्स सातवा’ – पवित्र रोमन सम्राट यांचे निधन (जन्म: 6 ऑगस्ट 1697)
- 1891: ‘डेविड कालाकौ’ – आहवाईचा राजा यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1836)
- 1901: झेनोब ग्राम’ – बेल्जियन अभियंते, ग्राम यंत्राचे संशोधक यांचे निधन (जन्म: 4 एप्रिल 1826)
- 1936: ‘जॉर्ज पाचवा’ – युनायटेड किंगडमचा राजा यांचे निधन. (जन्म: 3 जून 1865)
- 1951: ‘अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर’ – समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1869)
- 1980: ‘कस्तुरभाई लालभाई’ – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1894)
- 1988: ‘खान अब्दुल गफार खान’ – स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते यांचे निधन. (जन्म: 3 जून 1890)
- 1993: ‘आँड्रे हेपबर्न’ – अँग्लो-डच अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 मे 1929)
- 2005: ‘पेर बोरटें’ – नॉर्वे देशाचे 18वे पंतप्रधान यांचे निधन (जन्म: 3 एप्रिल 1913)
सोशल मिडिया लिंक
प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे
इतर पेज