2 ऑगस्ट दिनविशेष
2 august dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
2 ऑगस्ट दिनविशेष - घटना :
- 1677 : शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली.
- 1790 : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
- 1870 : टॉवर सबवे, जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे, लंडनमध्ये उघडली.
- 1923 : केल्विन कूलिज हे अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
- 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
- 1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
- 1990 : इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली.
- 1996 : अटलांटा ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ऍथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.
- 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.
- वरीलप्रमाणे 2 ऑगस्ट दिनविशेष 2 august dinvishesh
2 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :
- 1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
- 1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
- 1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
- 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
- 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
- 1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
- 1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
- 1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
- 1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
- 1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
- 1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
- 1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1945 : ‘बंकर रॉय’ – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
- 1958 : ‘अर्शद अयुब’ – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 2 ऑगस्ट दिनविशेष 2 august dinvishesh
2 ऑगस्ट दिनविशेष - मृत्यू :
- 1589 : ‘हेन्री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
- 1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
- 1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
- 1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
- 1978 : ‘अॅन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)
सोशल मिडिया लिंक
ऑगस्ट दिनविशेष
इतर पेज