16 ऑगस्ट दिनविशेष
16 august dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

16 ऑगस्ट दिनविशेष

16 ऑगस्ट दिनविशेष - घटना :

  • 1913 : तोहोकू विद्यापीठ हे महिलांना प्रवेश देणारे जपानमधील पहिले विद्यापीठ ठरले.
  • 1946 : कोलकाता येथे कास्ट दंगल उसळली, 72 तासांत सुमारे 4,000 लोक मारले गेले.
  • 1946 : ऑल हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेस सिकंदराबादमध्ये स्थापन झाली.
  • 1954 : स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1960 : सायप्रसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1962 : आठ वर्षांनंतर, उर्वरित फ्रेंच भारतीय प्रदेश भारताला देण्यात आले.
  • 1994 : बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडिश पेन क्लबतर्फे कर्ट तुचोलस्की साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2010 : चीनने जपानला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली.
  • वरीलप्रमाणे 16 ऑगस्ट दिनविशेष 16 august dinvishesh

16 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :

  • 1879 : ‘जगन्नाथ रघुनाथ आजगावकर’ – संतचरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑगस्ट 1955)
  • 1904 : ‘सुभद्राकुमारी चौहान’ – हिन्दी कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 फेब्रुवारी 1948)
  • 1913 : ‘मेनाकेम बेगीन’ – इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 9 मार्च 1992)
  • 1948 : ‘हे बेरी’ – भारतीय-डच रॉक संगीतकार यांचा जन्म.
  • 1950 : ‘जेफ थॉमसन’ – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज यांचा जन्म.
  • 1952 : ‘कीर्ती शिलेदार’ – गायिका व अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘हेमलता’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
  • 1957 : ‘आर. आर. पाटील’ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 2015)
  • 1958 : ‘मॅडोना’ – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका यांचा जन्म.
  • 1958 : ‘महेश मांजरेकर’ – भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते यांचा जन्म.
  • 1968 : ‘अरविंद केजरीवाल’ – भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे 7वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘मनीषा कोईराला’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘सैफ अली खान’ – अभिनेता यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 16 ऑगस्ट दिनविशेष 16 august dinvishesh

16 ऑगस्ट दिनविशेष - मृत्यू :

  • 1705 : ‘जेकब बर्नोली’ – स्विस गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 डिसेंबर 1654)
  • 1886 : ‘रामकृष्ण खुदिराम परमहंस’ – स्वामी विवेकानंदांचे गुरू यांनी समाधी घेतली. (जन्म : 18 फेब्रुवारी 1836 – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)
  • 1888 : ‘जॉन पंबरटन’ – कोका-कोला चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1831)
  • 1961 : ‘अब्दुल हक’ – भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान यांचे निधन. (जन्म : 20 एप्रिल 1870)
  • 1977 : ‘एल्व्हिस प्रिस्टले’ – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल यांचे निधन. (जन्म : 8 जानेवारी 1935)
  • 1997 : ‘पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री पणशीकर’ अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे यांचे निधन.
  • 1997 : ‘नुसरत फतेह अली खान’ – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक यांचे निधन. (जन्म : 13 ऑक्टोबर 1948)
  • 2000 : ‘रेणू सलुजा’ – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक यांचे निधन. (जन्म : 5 जुलै 1952 – नवी दिल्ली)
  • 2003 : ‘इदी अमीन’ – युगांडाचा हुकुमशहा यांचे निधन.
  • 2010 : ‘नारायण गंगाराम सुर्वे’ – कवी यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1926)
  • 2018 : ‘अटल बिहारी वाजपेयी’ – भारताचे 10 वे पंतप्रधान व कवी (जन्म :25 डिसेंबर 1924)
  • 2020 : ‘चेतन चौहान’ – माजी क्रिकेटर यांचे निधन (जन्म :21 जुलै 1947)