18 ऑगस्ट दिनविशेष
18 august dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

18 ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिन :

  • कधीही हार मानू नका दिवस

18 ऑगस्ट दिनविशेष - घटना :

  • 1841 : जगातील पहिले राष्ट्रीय अग्निशमन दल ब्रिटनमध्ये स्थापन झाले.
  • 1920 : अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1942 : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकवण्यात आला.
  • 1945 : सुकर्णो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1958 : बांगलादेशचा ब्रोजन दास इंग्लिश चॅनल पार करणारा पहिला आशियाई बनला.
  • 1963 : जेम्स मेरेडिथ मिसिसिपी विद्यापीठातून पदवीधर होणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले.
  • 1999 : सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या किंवा गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर पोलिस कोठडीत असलेल्या व्यक्तींना मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली.
  • 2008 : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
  • वरीलप्रमाणे 18 ऑगस्ट दिनविशेष 18 august dinvishesh

18 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :

  • 1700 : ‘थोरले बाजीराव पेशवे’ – मराठा साम्राज्याचे पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1740)
  • 1734 : ‘रघुनाथराव पेशवा’ – यांचा जन्म. (मृत्यू : 11 डिसेंबर 1783)
  • 1792 : ‘जॉन रसेल’ – युनायटेड किंगडमचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1872 : ‘पं. विष्णू दिगंबर पलुसकर’ – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1931)
  • 1886 : ‘सेवानंद गजानन नारायण कानिटकर’ – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 नोव्हेंबर 1959)
  • 1900 : ‘विजयालक्ष्मी पंडीत’ – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहिण, राजदूत, राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 1 डिसेंबर 1990)
  • 1923 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर गुगली गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 22 जून 1955)
  • 1934 : ‘गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1936 : ‘रॉबर्ट रेडफोर्ड’ – हॉलिवूडमधील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी यांचा जन्म.
  • 1956 : ‘संदीप पाटील’ – भारतीय फलंदाज यांचा जन्म.
  • 1959 : ‘निर्मला सीतारामन्’ – केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म.
  • 1967 : ‘दलेर मेहंदी’ – पंजाबी पॉप गायक यांचा जन्म.
  • 1980 : ‘प्रीती जंघियानी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 18 ऑगस्ट दिनविशेष 18 august dinvishesh

18 ऑगस्ट दिनविशेष
18 August dinvishesh
मृत्यू :

  • 1227 : ‘चंगीझ खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन.
  • 1850 : ‘ऑनोरे दि बाल्झाक’ – फ्रेंच लेखक यांचे निधन.
  • 1886 : ‘एली व्हिटनी ब्लेक’ – मॉर्टिस लॉक चे शोधक यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1795)
  • 1919 : ‘जोसेफ ई. सीग्राम’ – सीग्राम कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1841)
  • 1940 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1875)
  • 1945 : ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ – भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 23 जानेवारी 1897)
  • 1979 : ‘वसंतराव नाईक’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 जुलै 1913)
  • 1998 : ‘पर्सिस खंबाटा’ – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1948)
  • 2008 : ‘नारायण धारप’ – रहस्यकथाकार यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1925)
  • 2009 : ‘किम दे-जुंग’ – दक्षिण कोरियाचे 8वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 2012 : ‘रा. की. रंगराजन’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन.

18 ऑगस्ट दिनविशेष
18 August dinvishesh
जागतिक दिन लेख :

18 August dinvishesh
कधीही हार मानू नका दिवस

“कधीही हार मानू नका” दिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या जिद्दीला आणि दृढनिश्चयाला समर्पित एक विशेष दिवस आहे. 18 ऑगस्ट रोजी साजरा होणारा हा दिवस आपल्याला अपयशाच्या प्रसंगातही हार न मानता सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतो. जीवनात प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु त्या अडचणींवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचणं हीच खरी जिद्द आहे.

कधीही हार मानू नका दिवस आपल्याला आठवण करून देतो की, प्रत्येक अडथळा हा एक नवा धडा आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की, आपलं ध्येय अप्राप्य आहे, परंतु ती वेळच आपल्या प्रयत्नांची खरी कसोटी असते. या दिवशी आपण आपल्या उद्दिष्टांची नव्याने आठवण करून घेतो आणि त्याच्या दिशेने न थांबता पुढे जाण्याचा संकल्प करतो.

हा दिवस केवळ वैयक्तिक प्रेरणेपुरता मर्यादित नसून, तो आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरित करतो. कधीही हार न मानण्याची जिद्द, सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करत राहण्याची महत्त्वाची शिकवण आपल्याला आयुष्यातील प्रत्येक आव्हान पेलण्यास समर्थ करते.

18 August dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

18 ऑगस्ट रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 18 ऑगस्ट रोजी कधीही हार मानू नका दिवस असतो.
ऑगस्ट दिनविशेष
सोमंबुगुशु
31    12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज