21 ऑगस्ट दिनविशेष
21 august dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली
21 ऑगस्ट दिनविशेष - घटना :
- 1718 : तुर्की आणि व्हेनिस यांच्यात शांतता करार झाला.
- 1842 : तस्मानियामध्ये होबार्ट शहराची स्थापना झाली.
- 1888 : विल्यम बरोज यांनी बेरीज करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
- 1911 : : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
- 1944 : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या योजनांबाबत अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
- 1959 : हवाई हे अमेरिकेचे पन्नासावे राज्य बनले.
- 1972 : वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 भारतात मंजूर झाला
- 1988 : 6.9 मेगावॅट तीव्रतेने नेपाळ भूकंपाने नेपाळ-भारत सीमेवर भूकंप, अनेक लोक ठार आणि हजारो जखमी झाले.
- 1991 : लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
- 1993 : मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
- 2022 : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान 50 लोक मरण पावले.
- वरीलप्रमाणे 21 ऑगस्ट दिनविशेष 21 august dinvishesh
21 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :
- 1765 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 20 जून 1837)
- 1871 : ‘गोपाळ कृष्ण देवधर’ – भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1935)
- 1789 : ‘ऑगस्टिन कॉशी’ – फ्रेन्च गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 मे 1857)
- 1905 : ‘बिपीन गुप्ता’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1981)
- 1907 : ‘पी. जीवनवंश’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 18 जानेवारी 1965)
- 1909 : ‘नागोराव घन :श्याम देशपांडे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2000)
- 1910 : ‘नारायण बेन्द्रे’ – जगप्रसिद्ध चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 फेब्रुवारी 1992)
- 1924 : ‘श्रीपाद दाभोळकर’ – गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 30 एप्रिल 2001)
- 1934 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2001)
- 1939 : ‘फेस्टस मोगे’ – बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1961 : ‘व्ही. बी. चन्द्रशेखर’ – भारताचा फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
- 1963 : ‘मोहम्मद (सहावा)’ – मोरोक्कोचा राजा यांचा जन्म.
- 1973 : ‘सर्गेइ ब्रिन’ – गूगल चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1981 : ‘कॅमेरॉन विंकल्वॉस’ – कनेक्ट्यू चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1986 : ‘उसेन बोल्ट’ – जमैकाचा धावपटू यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 21 ऑगस्ट दिनविशेष 21 august dinvishesh
21 ऑगस्ट दिनविशेष - मृत्यू :
- 1931 : ‘पं. विष्णू दिगंबर’ – पलुसकर संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य यांचे निधन. (जन्म : 18 ऑगस्ट 1872)
- 1940 : ‘लिऑन ट्रॉट्स्की’ – रशियन क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 7 नोव्हेंबर 1879)
- 1947 : ‘इटोर बुगाटी’ – बुगाटी कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1881)
- 1976 : ‘पांडुरंग नाईक’ – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर यांचे निधन. (जन्म : 13 डिसेंबर 1899)
- 1978 : ‘विनू मांकड’ – भारतीय क्रिकेट खेळाडू याचं निधन. (जन्म : 12 एप्रिल 1917)
- 1981 : ‘काकासाहेब कालेलकर’ – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ याचं निधन. (जन्म : 1 डिसेंबर 1885 – सातारा, महाराष्ट्र)
- 1991 : ‘गोपीनाथ मोहंती’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 20 एप्रिल 1914)
- 1995 : ‘सुब्रमण्यन चंद्रशेखर’ – नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1910)
- 2000 : ‘निर्मला गांधी’ – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा यांचे निधन.
- 2000 : ‘विनायकराव कुलकर्णी’ – स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत यांचे निधन.
- 2001 : ‘शरद तळवलकर’ – मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते यांचे निधन. (जन्म : 1 नोव्हेंबर 1921)
- 2001 : ‘शं. ना. अंधृटकर’ – मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले यांचे निधन.
- 2004 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय उडिया भाषा कवी यांचे निधन. (जन्म : 13 मे 1916)
- 2006 : ‘बिस्मिला खान’ – भारतरत्न ख्यातनाम सनईवादक यांचे निधन. (जन्म : 21 मार्च 1916)
21 ऑगस्ट दिनविशेष - जागतिक दिन लेख :
आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली
हा दिवस दहशतवादामुळे पीडित झालेल्या लोकांच्या दु:खावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या वेदना आणि दुःख यांना या दिवसाद्वारे मान्यता दिली जाते.
दहशतवादाचा परिणाम केवळ पीडितांवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबांवर, मित्रांवर आणि समाजावरही होतो. दहशतवादाचे पाश जगभर पसरले असून, विविध देशांमध्ये असंख्य लोकांना याचा फटका बसला आहे. पीडितांचे हक्क आणि त्यांच्या गरजा ओळखणे आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची स्थापना केली असून, या निमित्ताने जगभरातील लोकांना पीडितांच्या साहाय्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी, हा दिवस जागतिक एकता आणि समर्थनाचे प्रतीक मानला जातो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 21 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली असतो.