9 ऑगस्ट दिनविशेष
9 august dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

9 ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिन :

  • क्रांती दिवस
  • जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस

9 ऑगस्ट दिनविशेष - घटना :

  • 1173 : पिसाच्या टॉवरचे बांधकाम सुरू झाले. हा मिनार तयार होण्यास 200 वर्षे लागली आणि चुकून तिरका बांधला गेला.
  • 1892 : थॉमस एडिसनला डबल वायर मशीनचे पेटंट मिळाले.
  • 1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • 1942 : क्रांती दिन
  • 1945 : अमेरिकेने जपानच्या नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला..
  • 1965 : मलेशियातून हद्दपार झाल्यानंतर सिंगापूर स्वतंत्र राष्ट्र बनले. आपल्या इच्छेविरुद्ध स्वातंत्र्य मिळालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • 1974 : वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
  • 1993 : भारत छोडो आंदोलनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सरहद गांधी’, खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
  • 1975 : पंतप्रधानांना न्यायालयात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.
  • 2000 : भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्लीच्या औद्योगिक संशोधन संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी पुरस्कार प्रदान करण्यात आला
  • वरीलप्रमाणे 9 ऑगस्ट दिनविशेष 9 august dinvishesh
9 august dinvishesh

9 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :

  • 1754 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1825)
  • 1776 : ‘अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो’ – इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1856)
  • 1862 : ‘गंगाधर मेहेर’ – ओडिया रिती कवी यांचा जन्म.
  • 1890 : ‘केशवराव भोसले’ – संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य यांचा जन्म. (मृत्यू : 4 आक्टोबर 1921)
  • 1892 : ‘शियाळि रामामृत रंगनाथन्’ – भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ यांचा जन्म.
  • 1909 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1992)
  • 1920 : ‘कृ. ब. निकुम्ब’ – घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी यांचा जन्म.
  • 1936 : ‘सतीश कुमार’ – भारतीय ब्रिटिश कार्यकर्ते आणि वक्ता यांचा जन्म.
  • 1975 : ‘महेश बाबू’  भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म.
  • 1991 : ‘हंसिका मोटवानी’ – अभिनेत्री व मॉडेल यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 9 ऑगस्ट दिनविशेष 9 august dinvishesh

9 ऑगस्ट दिनविशेष
9 August dinvishesh
मृत्यू :

  • 117 : 117ई.पुर्व  : ‘ट्राजान – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 सप्टेंबर 53)
  • 1107 : ‘होरिकावा’ – जपानी सम्राट यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1078)
  • 1901 : ‘विष्णूदास अमृत भावे’ – मराठी रंगभुमीचे जनक यांचे निधन.
  • 1948 : ‘हुगो बॉस’ – हुगो बॉस कानी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1885)
  • 1976 : ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1914)
  • 1996 : ‘फ्रॅंक व्हाटलेट’ – जेट इंजिन चे शोधक यांचे निधन. (जन्म : 1 जुन 1907)
  • 2002 : ‘शांताबाई दाणी’ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1918)
  • 2015 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचे निधन. (जन्म : 8 जून 1915)

9 ऑगस्ट दिनविशेष
9 August dinvishesh
जागतिक दिन लेख :

9 August dinvishesh
क्रांती दिवस

क्रांती दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका महत्त्वपूर्ण घटनेची आठवण करून देतो. 1942 साली महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारविरोधात जनतेला उभे राहण्याचे आवाहन केले. या दिवशी, देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा मिळाली. 

या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतःला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी पुढे आले आणि अनेकांना त्यासाठी बलिदानही द्यावे लागले. क्रांती दिवस आपल्याला त्या शूरवीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीते आयोजित केली जातात. हा दिवस आपणास देशभक्तीची प्रेरणा देतो आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला कर्तव्यपथावर ठेवतो.

9 August dinvishesh
जागतिक आदिवासी दिवस

जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील आदिवासी समुदायांच्या हक्कांना आणि संस्कृतीला मान्यता देण्यासाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1994 साली या दिवसाची सुरुवात केली. आदिवासी समुदायांची विविधता, सांस्कृतिक वारसा, आणि त्यांच्या समस्या यांना जागतिक पातळीवर महत्त्व देण्याचे उद्दिष्ट या दिवसाचे आहे. 

आदिवासी समुदायांचे अधिकार, शिक्षण, आरोग्यसेवा, आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आदिवासींच्या परंपरा, त्यांची जीवनशैली, आणि पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले जाते. सरकारे, स्वयंसेवी संस्था, आणि जागतिक समुदाय एकत्र येऊन आदिवासींच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्य करतात. जागतिक आदिवासी दिवस आपल्याला स्मरण करून देतो की, आदिवासी समुदायांचा सन्मान आणि त्यांचे हक्क जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांची संस्कृती आणि जीवनशैली जपून आपण अधिक समृद्ध आणि समावेशक समाजाची निर्मिती करू शकतो.

9 August dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

9 ऑगस्ट रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिवस असतो.
  • 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो.
ऑगस्ट दिनविशेष
सोमंबुगुशु
31    12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज