25 ऑगस्ट दिनविशेष
25 august dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

25 ऑगस्ट दिनविशेष

25 ऑगस्ट दिनविशेष - घटना :

  • 1609 : गॅलिलिओने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1825 : उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
  • 1919 : लंडन ते पॅरिस अशी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस मुक्त केले.
  • 1960 : रोम, इटली येथे 17 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1980 : झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1991 : बेलारूस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  • 1991 : लिनस ट्रोव्हलडसने लिनक्स संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 1991 : एअरबस ए-320 ने पहिले उड्डाण घेतले.
  • 1997 : दक्षिण कन्नड जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
  • 1998 : भारत सरकारने जगप्रसिद्ध विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका च्या आयातीवर बंदी घातली.
  • 2001 : सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार जाहीर केला
  • वरीलप्रमाणे 25 ऑगस्ट दिनविशेष 25 august dinvishesh

25 ऑगस्ट दिनविशेष - जन्म :

  • 1923 : ‘गंगाधर गाडगीळ’ – साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 15 सप्टेंबर 2008)
  • 1930 : ‘शॉन कॉनरी’ – जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता यांचा जन्म.
  • 1936 : ‘गिरिधारीलाल केडिया’ – इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 2009)
  • 1941 : ‘अशोक पत्की’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1952 : ‘दुलीप मेंडिस’  – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1957 : ‘सिकंदर बख्त’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1962 : ‘डॉ. तस्लिमा नसरीन’ – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका यांचा जन्म.
  • 1965 : ‘संजीव शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1969 : ‘विवेक राजदान’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1994 : ‘काजोल आयकट’ – भारतीय लेखक आणि कादंबरीकार यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 25 ऑगस्ट दिनविशेष 25 august dinvishesh

25 ऑगस्ट दिनविशेष - मृत्यू :

  • 1270 : ‘लुई (नववा)’ –  फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1214)
  • 1819 : ‘जेम्स वॅट’ – स्कॉटिश संशोधक यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1736)
  • 1822 : ‘विल्यम हर्षेल’ – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1738)
  • 1867 : ‘मायकेल फॅरेडे’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 22 सप्टेंबर 1791)
  • 1908 : ‘हेन्री बेक्वेरेल’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1852)
  • 2000 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार यांचे निधन. (जन्म : 27 मार्च 1901)
  • 2001 : ‘डॉ. व. दि. कुलकर्णी’ – संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक यांचे निधन.
  • 2001 : ‘केन टाइरेल’ – टायरेल रेसिंग चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 मे 1924)
  • 2008 : ‘सईद अहमद शाह’ – उर्दू शायर यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1931)
  • 2012 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1930)
  • 2013 : ‘रघुनाथ पनिग्राही’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1932)