21 फेब्रुवारी दिनविशेष
21 february dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
21 फेब्रुवारी दिनविशेष - घटना :
- 1804: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह – पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.
- 1842: जॉन ग्रिनो यांना शिलाई मशीनसाठी पहिले अमेरिकन पेटंट देण्यात आले.
- 1878: कनेक्टिकटमधील न्यू हेवन येथे पहिली टेलिफोन डायरेक्टरी जारी करण्यात आली.
- 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना 20 हे चंद्रावर उतरले.
- 1999: हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जाहीर केला
- वरील प्रमाणे 21 फेब्रुवारी दिनविशेष | 21 february dinvishesh
21 फेब्रुवारी दिनविशेष - जन्म :
- 1788: ‘फ्रान्सिस रोनाल्ड्स’ – ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1873)
- 1894: ‘डॉ. शांतिस्वरुप भटनागर’ – वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1955)
- 1899: ‘सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1961)
- 1911: ‘भबतोष दत्ता’ – अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1997)
- 1942: ‘जयश्री गडकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 2008)
- वरील प्रमाणे 21 फेब्रुवारी दिनविशेष | 21 february dinvishesh
21 फेब्रुवारी दिनविशेष - 21 february dinvishesh मृत्यू :
- 1829: ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1778)
- 1975: ‘गजानन हरी नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1912)
- 1977: ‘रा. श्री. जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 15 मे 1903)
- 1991: ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 जून 1936)
- 1998: ‘ओमप्रकाश बक्षी’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1919)
21 फेब्रुवारी दिनविशेष - 21 february dinvishesh
जागतिक दिन लेख :
अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने 1999 साली हा दिवस जाहीर केला आणि 2000 पासून तो अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मातृभाषा हा प्रत्येक व्यक्तीच्या संस्कृतीचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग असतो. जगभरातील भाषांचे संवर्धन आणि विविधतेचे जतन करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस बांगलादेशच्या भाषासंग्रामाशी संबंधित आहे. 1952 साली पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) येथे बंगाली भाषेसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बलिदान द्यावे लागले. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.
मातृभाषेमध्ये शिक्षण घेणे मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळे स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या युगातही मातृभाषेचे महत्त्व अबाधित ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. “आपली भाषा, आपली ओळख!”
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 21 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस असतो.