11 एप्रिल दिनविशेष
11 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस National Safe Motherhood Day
11 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1919 : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली.
- 1970 : अपोलो प्रोग्राम: अपोलो 13 लाँच झाला.
- 1979 : युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन सत्तेतून पळून गेला.
- 1976 : ऍपल कंपनीने ऍपल I हे कॉम्पुटर तयार झाले.
- 1986 : हॅलीच्या धूमकेतूने साडेसहा लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचले.
- 1992 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
- 1999: अग्नि-II क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- वरील प्रमाणे 11 एप्रिल दिनविशेष | 11 april dinvishesh
11 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1755 : ‘जेम्स पार्किन्सन’ – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1824)
- 1770 : ‘जॉर्ज कॅनिंग’ – ब्रिटनचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑगस्ट 1827)
- 1827 : ‘जोतिराव गोविंदराव फुले’ ऊर्फ महात्मा फुले – श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1890)
- 1869 : ‘कस्तुरबा गांधी’ – यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1944)
- 1887 : ‘जेमिनी रॉय’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 1972)
- 1904 : ‘कुंदनलान सैगल’ – गायक आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1947)
- 1906 : ‘डॉ. सुमित्र मंगेश कत्रे’ – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक यांचा जन्म.
- 1908 : ‘मसारू इबुका’ – सोनी कंपनी च्या सह्संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1997)
- 1937 : ‘रामनाथन कृष्णन’ – लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1951 : ‘रोहिणी हटंगडी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 11 एप्रिल दिनविशेष | 11 april dinvishesh

11 एप्रिल दिनविशेष
11 april dinvishesh
मृत्यू :
- 1926 : ‘ल्यूथर बरबँक’ – अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1849)
- 1977 : ‘फन्नीश्वर नाथ रेणू’ – भारतीय लेखक आणि कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 4 मार्च 1921)
- 2000 : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1917)
- 2003 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 6 ऑगस्ट 1900)
- 2009 : ‘विष्णु प्रभाकर’ – भारतीय लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 21 जून 1912)
- 2015 : भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: 6 जुलै 1933)
11 एप्रिल दिनविशेष
11 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस National Safe Motherhood Day
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मातृत्व अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि सन्मानाने भरलेले बनवणे. भारत सरकारने गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी व जनजागृतीसाठी या दिवसाची सुरुवात केली. गर्भधारणेदरम्यान योग्य वैद्यकीय सेवा, पौष्टिक आहार, नियमित तपासणी आणि सुरक्षित प्रसूती या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात.
मातांचे मृत्यू दर कमी करण्यासाठी शासन विविध योजना राबवते, जसे की जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी. ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावतात.
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी शिबिरे, जनजागृती रॅली, आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक आईला सुरक्षित मातृत्वाचा हक्क आहे, हे या दिवसाचे खरे संदेश आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

- 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस National Safe Motherhood Day असतो.