3 एप्रिल दिनविशेष
3 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- जागतिक जलचर प्राणी दिवस World Aquatic Animal Day
- जागतिक पार्टी दिवस World Party Day
3 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1948: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.
- 1973: मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
- 1975 : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर अनातोली कार्पोव्ह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
- 1984 : राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर, यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून उड्डाण केले. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अंतराळात होते.
- 2000 : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
- 2010: ऍपल कंपनीने आयपॅड टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
- 2016: पनामा पेपर्स या कायदेशीर दस्तऐवजाने सुमारे 2,14,488 कंपन्यांची गोपनीय माहिती उघड केली.
- वरील प्रमाणे 3 एप्रिल दिनविशेष | 3 april dinvishesh
3 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1781 : ‘स्वामीनारायण’ – हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1830)
- 1882 : ‘नाथमाधव’ – सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1928)
- 1898 : ‘हेन्री लुस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1967)
- 1903 : ‘कमलादेवी चट्टोपाध्याय’ – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1988)
- 1904: ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 1991)
- 1914 : ‘सॅम माणेकशा’ – फील्ड मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 2008)
- 1930 : ‘हेल्मुट कोल्ह’ – जर्मन चॅन्सेलर यांचा जन्म.
- 1934 : ‘जेन गुडॉल’ – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1942 : ‘आदि गोदरेज’ – भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष यांचा जन्म.
- 1949 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक व निर्माते यांचा जन्म.
- 1955 : ‘हरिहरन’ – सुप्रसिद्ध गायक यांचा जन्म.
- 1962 : ‘जयाप्रदा’ – चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य यांचा जन्म.
- 1965 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
- 1973 : ‘निलेश कुलकर्णी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 3 एप्रिल दिनविशेष | 3 april dinvishesh

3 एप्रिल दिनविशेष
3 april dinvishesh
मृत्यू :
- 1680 : छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1630)
- 1891 : ‘एडवर्ड लूकास’ – फ्रेन्च गणिती यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1842)
- 1981 : ‘जुआन त्रिप्प’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक यांचे निधन.(जन्म: 27 जून 1899)
- 1985 : ‘डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 13 मार्च 1893)
- 1998 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1900)
- 1998 : ‘हरकिसन मेहता’ – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार यांचे निधन.
- 2012 : ‘गोविंद नारायण’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 5 मे 1916)
3 एप्रिल दिनविशेष
3 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
राकेश शर्मा
राकेश शर्मा भारतातील पहिले अंतराळवीर यांचा जन्म 13 जानेवारी 1949 रोजी पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यात झाला.
राकेशला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. तुटलेल्या वस्तू बनवायची आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बारीक नजर ठेवायची ही त्याची सवय होती.
राकेश मोठा झाल्यावर तो आकाशात उडणारे विमान त्याच्या नजरेतून दिसेनासे होईस्तोवर पाहत असे. लवकरच राकेशच्या मनात आकाशात उडण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो त्या दिशेने वाटचाल करू लागला.
3 एप्रिल 1984 रोजी राकेश शर्माला सोयुझ टी-11 मध्ये दोन अन्य सोव्हिएत अंतराळवीरांसह प्रक्षेपित करण्यात आले. या उड्डाणात आणि सल्युत 7 स्पेस स्टेशनमध्ये त्यांनी उत्तर भारताचे छायाचित्रण केले आणि गुरुत्वाकर्षणचा अभ्यास केला.
अंतराळात जाणारे ते भारतातील पहिले आणि जगातील 138वे अंतराळवीर होते.
अंतराळ उड्डाणाच्या वेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारले की अंतराळातून भारत कसा दिसतो? राकेश शर्मा यांनी उत्तर दिले- “सारे जहाँ से अच्छा”.
भारत सरकारने त्यांना अशोक चक्राने सन्मानित केले. विंग कमांडर पदावरून निवृत्तीनंतर राकेश शर्मा यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये चाचणी पायलट म्हणून काम केले.
जागतिक जलचर प्राणी दिवस
जागतिक जलचर प्राणी दिवस दरवर्षी 3 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस समुद्री आणि गोड्या पाण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मासे, कासव, डॉल्फिन, ऑक्टोपस, प्रवाळ आणि इतर जलचर प्राणी आपल्या परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आजच्या काळात जलप्रदूषण, अति-मच्छीमारी, हवामान बदल आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे.
या दिवसाच्या निमित्ताने विविध संस्था आणि पर्यावरणप्रेमी लोक समुद्र आणि नद्यांमधील जीवसृष्टी वाचवण्यासाठी मोहिमा राबवतात. प्रत्येकाने आपल्या स्तरावर जलचर प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत, जसे की प्लास्टिकचा कमी वापर करणे, जलस्रोत स्वच्छ ठेवणे आणि टिकाऊ मासेमारीला प्रोत्साहन देणे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 3 एप्रिल रोजी जागतिक जलचर प्राणी दिवस असतो.