12 एप्रिल दिनविशेष
12 एप्रिल दिनविशेष 12 April dinvishesh
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
12 एप्रिल दिनविशेष - जागतिक दिवस :
- वाचण्याचा दिवस Drop Everything And Read Day
- मानवी अंतराळ उड्डाण दिवस Human Space Flight Day
12 April dinvishesh
12 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1606 : ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केला.
- 1935 : प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
- 1945 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे पदावर असताना निधन झाले.
- 1955 : डॉ. जोनास साल्क यांनी विकसित केलेली पोलिओ लस सुरक्षित आणि प्रभावी घोषित करण्यात आली.
- 1961 : रशियाचा युरी गागारिन हे अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळवीर ठरले, त्यांनी 108 मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली.
- 1967 : कैलाशनाथ वांचू भारताचे 10 वे सरन्यायाधीश बनले.
- 1981 : स्पेस शटलचे पहिले प्रक्षेपण (कोलंबिया) झाले: एसटीएस-१ मोहीम.
- 1988 : SEBI ची स्थापना.
- 1997 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
- 1997 : पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची मुलाखत घेण्यास मनाई करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
- 1998 : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- 2009 : झिम्बाब्वेने अधिकृतपणे झिम्बाब्वे डॉलरचे चलन सोडून दिले.
12 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 599 : 599 ई.पुर्व : जैनांचे 24 वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.
- 1382 : ‘राजा संग्रामसिंग’ ऊर्फ राणा संग – मेवाडचा महापराक्रमी यांचा जन्म.
- 1871 : ‘वासुदेव गोविंद आपटे’ – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1930)
- 1910 : ‘पु. भा. भावे’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1980)
- 1914 : कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – संवाद व गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1995)
- 1917 : ‘विनू मांकड’ – सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 1978)
- 1932 : ‘लक्ष्मण कादिरमगार’ – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते यांचा जन्म.
- 1943 : ‘सुमित्रा महाजन’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
- 1954 : ‘सफदर हश्मी’ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1989)
12 एप्रिल दिनविशेष - मृत्यू :
- 1720 : बाळाजी विश्वनाथ भट – तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1662)
- 1817 : ‘चार्ल्स मेसिअर’ – फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 जून 1730)
- 1906 : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1836)
- 1912 : कारा बार्टन – अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1821)
- 1945 : ‘फ्रँकलिन डी. रुझवेल्ट’ – अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1882)
- 2001 : ‘देवांग मेहता’ – NASSCOM चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1960)
- 2001 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे जनक यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1921)
- 2001 : हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन.
- 2006 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1929)
12 April dinvishesh :
SEBI
स्पेस शटल कोलंबिया
स्पेस शटल कोलंबिया हे NASA ने बाह्य अवकाशात उड्डाण करण्यासाठी वापरलेले अंतराळयान होते. 12 एप्रिल 1981 रोजी अंतराळात उड्डाण करणारे हे पहिले अंतराळ यान होते. 1 फेब्रुवारी 2003 रोजी पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना ते तुटले आणि त्यावेळी त्यामध्ये असलेले सर्व सात लोक ठार झाले.
या शटलने एकूण 28 मोहिमांमध्ये उड्डाण केले. 1836 मध्ये जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या यूएस नेव्हीच्या जहाजावरून कोलंबियाचे नाव देण्यात आले. हे अपोलो 11 लुनार मॉड्यूलचे नाव देखील होते. शटलने एकूण 28 मोहिमांमध्ये उड्डाण केले. 1836 मध्ये जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या यूएस नेव्हीच्या जहाजावरून कोलंबियाचे नाव देण्यात आले.
क्रू:
कमांडर: रिक डी., यू.एस. हवाई दलाचे कर्नल आणि यांत्रिक अभियंता
पायलट: विल्यम सी. मॅककूल, यूएस नेव्ही कमांडर
पेलोड विशेषज्ञ: इलान रॅमन, इस्रायली हवाई दलातील कर्नल आणि पहिले इस्रायली अंतराळवीर
पेलोड कमांडर: मायकेल पी. अँडरसन, यूएस वायुसेनेचे लेफ्टनंट कर्नल आणि भौतिकशास्त्रज्ञ
मिशन स्पेशलिस्ट: कल्पना चावला, भारतीय वंशाची एरोस्पेस अभियंता
मिशन स्पेशालिस्ट: डेव्हिड एम. ब्राउन, यूएस नेव्हीचे कॅप्टन, विमानचालक आणि फ्लाइट सर्जन
मिशन स्पेशलिस्ट: लॉरेल क्लार्क, यूएस नेव्ही कॅप्टन आणि फ्लाइट सर्जन