19 एप्रिल दिनविशेष
19 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- World Liver Day जागतिक यकृत दिवस
19 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 1526 : मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने मुघल साम्राज्याचा पाया घातला.
- 1945 : सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- 1948 : ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- 1956 : गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
- 1971 : सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
- 1975 : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
- 2021 : इनजीनुटी हेलिकॉप्टर दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करणारे पहिले विमान ठरले
- वरील प्रमाणे 19 एप्रिल दिनविशेष | 19 april dinvishesh
19 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1868 : ‘पॉल हॅरिस’ – रोटरी क्लबचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1947)
- 1892 : ‘ताराबाई मोडक’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1973)
- 1912 : ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 25 फेब्रुवारी 1999)
- 1933 : ‘डिकी बर्ड’ – ख्यातनाम क्रिकेट पंच यांचा जन्म.
- 1957 : ‘मुकेश अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
- 1977 : ‘अंजू बॉबी जॉर्ज’ – भारतीय लाँग जम्पर यांचा जन्म.
- 1987 : ‘मारिया शारापोव्हा’ – रशियन लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 19 एप्रिल दिनविशेष | 19 april dinvishesh
19 एप्रिल दिनविशेष
19 april dinvishesh
मृत्यू :
- 1881 : ‘बेंजामिन डिझरेली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 डिसेंबर 1804)
- 1882 : ‘चार्ल्स डार्विन’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
- 1906 : ‘पिअर क्यूरी’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 मे 1859)
- 1910 : ‘अनंत कान्हेरे’ – क्रांतिकारक यांचे निधन.
- 1955 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 25 जुलै 1875)
- 1974 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 14 मे 1907)
- 1993 : ‘डॉ. उत्तमराव पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
- 1994 : मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो – पंजाबचे माजी मंत्री यांचे निधन.
- 1998 : ‘सौ. विमलाबाई गरवारे’ – उद्योजीका यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1928)
- 2003 : ‘मिर्जा ताहिर अहमद’ – भारतीय-इंग्रजी खलीफा यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1925)
- 2004 : ‘नॉरिस मॅक्विहिर’ – गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक यांचे निधन.
- 2008 : ‘सरोजिनी बाबर’ – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1920)
- 2009 : ‘अहिल्या रांगणेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या यांचे निधन. (जन्म: 8 जुलै 1922)
- 2010 : ‘मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष’ – लेखक आणि टीकाकार यांचे निधन. (जन्म: 7 जून 1913)
19 एप्रिल दिनविशेष
19 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
जागतिक यकृत दिवस
जागतिक यकृत दिवस दरवर्षी १९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे यकृताच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि यकृतविकारांचे वेळेवर निदान व प्रतिबंध यावर भर देणे.
यकृत (लिव्हर) हे शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे, जे अन्न पचवणे, विषारी घटक बाहेर टाकणे आणि ऊर्जा साठवणे यांसारखी अनेक कार्ये करते. परंतु चुकीचा आहार, मद्यसेवन, व्यायामाचा अभाव आणि इतर कारणांमुळे यकृताच्या समस्या वाढत आहेत. हेपाटायटिस, फॅटी लिव्हर, सिरोसिस हे यकृताचे प्रमुख विकार आहेत.
या दिवशी रुग्णालये, वैद्यकीय संस्था व स्वयंसेवी संघटना मोफत तपासणी शिबिरे, माहिती सत्रं, पोस्टर प्रदर्शने आणि आरोग्य रॅलीचे आयोजन करतात.
यकृताचे आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्य टाळणे गरजेचे आहे.
जागतिक यकृत दिवस आपल्याला शरीरातील या महत्त्वाच्या अवयवाचे संगोपन करण्याची जाणीव करून देतो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
19 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
- 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिवस असतो.