21 एप्रिल दिनविशेष
21 april dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

जागतिक दिन :
- भारतीय नागरी सेवा दिन
- जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिन World Creativity And Innovation Day
21 एप्रिल दिनविशेष - घटना :
- 753 : ईसा पूर्व: रोमची स्थापना रोम्युलसने केली.
- 1944 : फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
- 1960: ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोचे उद्घाटन झाले.
- 1972: अपोलो 16 अमेरिकन अंतराळवीर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर उतरले.
- 1997: भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी पदभार स्वीकारला
- 2000: सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आश्रित विधवांना देखील पालकांच्या मालमत्तेचा हक्क आहे.
- 2019 : श्रीलंकेतील चर्च, हॉटेल आणि इतर ठिकाणी आठ बॉम्बस्फोट; 250 हून अधिक लोक मारले गेले.
- वरील प्रमाणे 21 एप्रिल दिनविशेष | 21 april dinvishesh
21 एप्रिल दिनविशेष - जन्म :
- 1864 : ‘मॅक्स वेबर’ – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 1920)
- 1922 : ‘अॅलिएस्टर मॅकलिन’ – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1987)
- 1926 : ‘एलिझाबेथ (दुसरी)’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म.
- 1934 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म.
- 1945 : ‘श्रीनिवासराघवन वेंकटराघवन’ – भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर यांचा जन्म.
- 1950 : ‘शिवाजी साटम’ – हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- वरील प्रमाणे 21 एप्रिल दिनविशेष | 21 april dinvishesh

21 एप्रिल दिनविशेष
21 april dinvishesh
मृत्यू :
- 1509 : ‘हेन्री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1457)
- 1910 : ‘मार्क ट्वेन’ – अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1835)
- 1938 : ‘सर मुहम्मद इक्बाल’ – पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1877)
- 1946 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 जून 1883)
- 1952 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1889)
- 2013 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1929)
21 एप्रिल दिनविशेष
21 april dinvishesh
जागतिक दिन लेख :
भारतीय नागरी सेवा दिन
भारतीय नागरी सेवा दिन दरवर्षी २१ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो.
१९४७ साली, सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना नागरी सेवांचे महत्त्व विशद केले होते. त्यांच्या भाषणाच्या दिवशी म्हणजेच २१ एप्रिलला हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दिवशी भारत सरकारतर्फे विविध पुरस्कार आणि सन्मान दिले जातात, जसे की प्रधानमंत्री पुरस्कार, जे प्रभावी प्रशासन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी दिले जातात.
भारतीय नागरी सेवा ही देशाच्या विकासाची एक मजबूत रचना आहे. ते धोरणांची अंमलबजावणी, कायद्याचा अंमल, आणि लोकहिताच्या योजना पोहोचवण्याचे काम करतात.
भारतीय नागरी सेवा दिन म्हणजे जबाबदारी, निष्ठा आणि पारदर्शक सेवेचा गौरव करण्याचा दिवस!
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
21 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?
- 21 एप्रिल रोजी पिझ्झा डिलिव्हरी ड्रायव्हर प्रशंसा दिवस असतो.