23 एप्रिल दिनविशेष
23 april dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

23 april dinvishesh

जागतिक दिन :

  • इंग्रजी भाषा दिन English Language Day
  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन World Book & Copyright Day

23 एप्रिल दिनविशेष - घटना :

  • 1635 : बोस्टन लॅटिन स्कूल, अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा, स्थापन झाली.
  • 1818 : ब्रिटीश अधिकारी मेजर हॉल यांना कर्नल प्रायर यांनी रायगड किल्ल्यावर गस्त घालण्यासाठी पाठवले.
  • 1984 : वैज्ञानिकांना एड्सचा विषाणू सापडला.
  • 1990 : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1995 : जागतिक पुस्तक दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2005 : मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
  • वरील प्रमाणे 23 एप्रिल दिनविशेष | 23 april dinvishesh

23 एप्रिल दिनविशेष - जन्म :

  • 1564 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (निधन: 23 एप्रिल 1616)
  • 1791 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1868)
  • 1858 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1947)
  • 1858 : ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ – समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1922)
  • 1873 : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1944)
  • 1897 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 डिसेंबर 1972)
  • 1938 : ‘एस. जानकी’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1968 : ‘किशोरी शहाणे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1969 : ‘मनोज बाजपेयी’ – अभिनेते मनोज बाजपेयी यांचा जन्म.
  • 1977 : ‘काल पेन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते यांचा जन्म.
  • वरील प्रमाणे 23 एप्रिल दिनविशेष | 23 april dinvishesh

23 एप्रिल दिनविशेष
23 april dinvishesh
मृत्यू :

  • 1616 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1564)
  • 1850 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म: 7 एप्रिल 1770)
  • 1926 : ‘हेन्री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 डिसेंबर 2854)
  • 1958 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1871)
  • 1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1902)
  • 1986 : ‘जिम लेकर’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)
  • 1992 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 2 मे 1921)
  • 1997 : ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 मे 1918)
  • 2000 : ‘बाबासाहेब भोपटकर’ – 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे यांचे निधन.
  • 2001 : ‘जयंतराव टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1921)
  • 2007 : ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1931)
  • 2013 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1919)

23 एप्रिल दिनविशेष
23 april dinvishesh
जागतिक दिन लेख :

इंग्रजी भाषा दिन

प्रत्येक वर्षी 23 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनी पाळला जातो. इंग्रजी ही एक जागतिक भाषा आहे जी अनेक देशांमध्ये संवादाचे माध्यम म्हणून वापरली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यापार आणि संगणक क्षेत्रात इंग्रजीचे महत्त्व खूप मोठे आहे.

संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस इंग्रजी भाषेच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी जाहीर केला. इंग्रजी भाषा शिकणे आपल्याला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची चांगली समज करून घ्यावी, कारण ही भाषा रोजगार, करिअर आणि आंतरराष्ट्रीय संवादासाठी उपयोगी ठरते.

या दिवशी शाळा, महाविद्यालये, आणि ग्रंथालयांमध्ये विशेष कार्यक्रम, निबंध स्पर्धा आणि भाषणांचे आयोजन केले जाते. इंग्रजी भाषेचा आदर राखून आपण तिचा योग्य वापर करावा आणि अधिकाधिक ज्ञान प्राप्त करावे.

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन

23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. याचे आयोजन युनेस्कोतर्फे वाचनाची सवय वाढवणे, प्रकाशन व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लेखन हक्कांचे रक्षण करणे या उद्देशाने केले जाते.

पुस्तके ही ज्ञान, विचार आणि कल्पनांचे अमूल्य भांडार आहेत. वाचनामुळे माणसाची बौद्धिक वाढ होते, दृष्टिकोन विस्तारतो आणि व्यक्तिमत्त्व घडते. या दिवशी जगभरात वाचनालये, शाळा आणि संस्थांमध्ये वाचन अभियान, पुस्तक प्रदर्शने आणि लेखक भेटीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

कॉपीराइट म्हणजे लेखकाच्या साहित्यकृतीवर असलेला कायदेशीर हक्क. त्यामुळे लेखकांचे हक्क सुरक्षित राहतात आणि त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळते.

हा दिवस विल्यम शेक्सपियर आणि मिगेल दे सर्वांतेस यांचा मृत्यूदिन असल्याने विशेष मानला जातो.

चला, आपणही या दिवशी वाचनाचा संकल्प करू, आणि चांगल्या पुस्तकांचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य आदर आणि वापर करूय

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

23 एप्रिल रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 23 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिन असतो.
  • 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन असतो.
एप्रिल दिनविशेष
सोमंबुगुशु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930    
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज