आजचा दिनविशेष
Aajcha dinvishesh

4 जानेवारी दिनविशेष 4 january dinvishesh

4 जानेवारी दिनविशेष

आजचा जागतिक दिन :

  • जागतिक ब्रेल दिन
  • जागतिक सम्मोहन दिन

आजचा दिनविशेष - घटना :

  • 1493 : ख्रिस्तोफर कोलंबस त्याच्या पहिल्या प्रवासाच्या शेवटी नवीन जगातून परतला.
  • 1885 : आंत्रपुच्छ Aappendix काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
  • 1881 : लोकमान्य टिळकांनी पुण्यात केसरी वृत्तपत्र सुरू केले.
  • 1896 : यूटा अमेरिकेचे 45 वे राज्य म्हणून दाखल झाले.
  • 1926 : लखनौमध्ये क्रांतिकारकांचा प्रसिद्ध काकोरी खटला सुरू झाला.
  • 1948 : ब्रम्हदेश (म्यानमार) ला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • 1952 : इंग्रजांनी सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
  • 1954 : मेहरचंद महाजन यांनी भारताचे तिसरे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1958 : 1953 मध्ये एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
  • 1958 : 1957 मध्ये सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केलेला पहिला कृत्रिम पृथ्वी उपग्रह स्पुतनिक 1, कक्षेतून पृथ्वीवर पडला.
  • 1962 : पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सुरू झाली.
  • 1996 : साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
  • 2004 : नासाचे मानवरहित स्पिरिट रोव्हर मंगळावर उतरले.
  • 2010 : बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले.
  • वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh

आजचा दिनविशेष - जन्म :

  • 1643 : ‘सर आयझॅक न्यूटन’ – इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
  • 1809 : ‘लुई ब्रेल’ – आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतयार करणारे यांचा जन्म.(मृत्यू : 6 जानेवारी 1852)
  • 1813 : ‘आयझॅक पिट्समन’ – लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँड तयार करणारे यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1897)
  • 1889 : ‘मंडकोलातुर पतंजली शास्त्री’ – भारताचे दुसरे सरन्यायाधीश यांचा जन्म.
  • 1909 : ‘प्रभाकर पाध्ये’ – मराठी नवसाहित्यिकार यांचा जन्म.
  • 1914 : ‘इंदिरा संत’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री यांचा जन्म.(मृत्यू : 13 जुलै 2000)
  • 1923 : ‘लोटिका सरकार’ – भारतीय वकील (मृत्यू : 23 फेब्रुवारी 2013)
  • 1924 : ‘विद्याधर गोखले’ – खासदार, नाटककार, लेखक, उर्दू शायर आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 26 सप्टेंबर 1996)
  • 1925 : ‘प्रदीप कुमार’ – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 27 आक्टोबर 2001)
  • 1937 : ‘सुरेंद्रनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू (मृत्यू  : 5 मे 2012)
  • 1940 : ‘श्रीकांत सिनकर’ – मराठी कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1941 : ‘कल्पनाथ राय’ – केन्द्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1999)
  • 1953 : ‘टी.एस. ठाकुर’ – भारताचे 43 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे आजचा दिनविशेष aajcha dinvishesh

आजचा दिनविशेष - मृत्यू :

  • 1752 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1704)
  • 1851 : ‘दुसरे बाजीराव पेशवे’ – यांचे निधन.
  • 1907 : ‘गोवर्धनराम त्रिपाठी’ – गुजराथी लेखक यांचे निधन (जन्म : 20 ऑक्टोबर 1855)
  • 1908 : ‘राजारामशास्त्री भागवत’ – विद्वान व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1851)
  • 1961 : ‘आयर्विन श्रॉडिंगर’ – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1887)
  • 1965 : ‘टी. एस. इलियट’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1888)
  • 1994 : ‘आर. डी. बर्मन’ – सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार यांचे निधन. (जन्म : 27 जून 1939)
  • 2022 : ‘सिंधुताई सपकाळ’ – पद्मश्री, मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1936)
  • 2016 : ‘एस. एच. कपाडिया’ – भारताचे 38वे सरन्यायाधीश (जन्म : 29 सप्टेंबर 1947)
  • 2015 : ‘चितेश दास’ – भारतीय कोरिओग्राफर (जन्म : 9 नोव्हेंबर 1944)

आजचा दिनविशेष - जागतिक दिन लेख :

जागतिक ब्रेल दिन

जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस लुई ब्रेल यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. लुई ब्रेल हे अंध व्यक्तींना वाचन आणि लेखनाची क्षमता मिळवून देणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक होते.

ब्रेल लिपी ही सहा बिंदूंच्या विशिष्ट नमुन्यांद्वारे तयार केलेली लिपी आहे, ज्यामुळे अंध व्यक्तींना शिकणे आणि माहिती मिळवणे सुलभ होते. ही लिपी शिक्षण, स्वातंत्र्य, आणि समानतेचा मार्ग उघडते.

या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे अंध आणि दृष्टिहीन व्यक्तींना समाजात समान हक्क मिळवून देणे आणि ब्रेल लिपीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे होय. या दिवशी शाळा, संस्था, आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक ब्रेल दिन आपल्याला अंध व्यक्तींसाठी समान संधी निर्माण करण्याचा संदेश देतो. ब्रेल लिपीच्या वापरातून त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यास मोठी मदत होते.

जागतिक सम्मोहन दिन

जागतिक सम्मोहन दिन दरवर्षी ४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस सम्मोहन (हायप्नोटिझम) या मानसशास्त्रीय प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यासंदर्भात असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

सम्मोहन ही मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी, आणि वाईट सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. मानसोपचारतज्ज्ञांनी सिद्ध केले आहे की योग्य पद्धतीने केलेले सम्मोहन हे वैद्यकीय आणि मानसिक उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते.

हा दिवस लोकांमध्ये सम्मोहनाविषयीचे गैरसमज दूर करून त्याच्या वैज्ञानिक आणि सकारात्मक उपयोगांवर लक्ष केंद्रित करतो. सम्मोहन केवळ मनोरंजनासाठी नसून, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक उपयुक्त साधन ठरू शकते.

जागतिक सम्मोहन दिन आपल्याला सांगतो की मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि वाईट सवयी दूर करण्यासाठी या पद्धतीचा सकारात्मक उपयोग केला जाऊ शकतो. योग्य प्रशिक्षण आणि तज्ज्ञ मार्गदर्शनासोबत सम्मोहनाचा उपयोग अधिक प्रभावी होऊ शकतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

4 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिन असतो.
  • 4 जानेवारी रोजी जागतिक सम्मोहन दिन असतो.
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज
aajcha dinvishesh
आजचा दिनविशेष