2 जानेवारी दिनविशेष
2 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

2 जानेवारी दिनविशेष

2 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1757 : प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयाने ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता ताब्यात घेतला.
  • 1881 : लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
  • 1885 : पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले.
  • 1936 : मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने मनिला, फिलीपिन्स काबीज केले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी फ्रान्स, बेल्जियम आणि हॉलंडमधील विमानतळांवर हल्ला केला.
  • 1954 : राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
  • 1959 : चंद्राच्या जवळ पोहोचणारे पहिले अंतराळयान लुना 1 सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
  • वरीलप्रमाणे 2 जानेवारी दिनविशेष 2 january dinvishesh

2 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1920 : ‘आयझॅक असिमॉव्ह’ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 6 एप्रिल 1992)
  • 1932 : ‘हरचंदसिंग लोंगोवाल’ – अकाली दलाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 1985)
  • 1940 : ‘सतमंगलम रंगा अय्यंगार श्रीनिवास वराधन’ – भारतीय अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1959 : ‘कीर्ती आझाद’ – भारीतय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1960 : ‘रमण लांबा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 23 फेब्रुवारी 1998)
  • वरीलप्रमाणे 2 जानेवारी दिनविशेष 2 january dinvishesh

2 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1316 : ‘अल्लाउद्दीन खिलजी’ – दिल्लीचा सुलतान याचे निधन.
  • 1935 : ‘मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर’ – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील यांचे निधन. (जन्म : 19 ऑगस्ट 1886)
  • 1943 : ‘हुतात्मा वीर भाई कोतवाल’ यांचे निधन.
  • 1944 : ‘महर्षि विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1873)
  • 1952 : ‘जो डेव्हिडसन’ – व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार यांचे निधन.
  • 1989 : ‘सफदर हश्मी’ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1954)
  • 1999 : ‘विमला फारुकी’ – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या यांचे निधन.
  • 2002 : ‘अनिल अग्रवाल’ – पर्यावरणवादी यांचे निधन.
  • 2015 : ‘वसंत गोवारीकर’ – भारतीय शास्रज्ञ यांचे निधन.
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
इतर पेज