3 जानेवारी दिनविशेष
3 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

3 january dinvishesh

जागतिक दिन :

  • महिला मुक्ती दिन

3 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1496 : लिओनार्डो दा विंचीचा फ्लाइंग मशीनचा प्रयोग अयशस्वी झाला.
  • 1925 : बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.
  • 1947 : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजनवर चित्रीकरण करण्यात आले.
  • 1950 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्‍घाटन झाले.
  • 1952 : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
  • 1957 : हॅमिल्टन इलेक्ट्रिकने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगट घड्याळ लाँच केले.
  • 1959 : अलास्का अमेरिकेचे 49 वे राज्य म्हणून दाखल झाले
  • 1977 : ऍपल कॉम्प्युटरची स्थापना झाली
  • 1999 : नासाने मार्स पोलर लँडर लाँच केले
  • 2004 : नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान राज्य संरक्षित स्मारक म्हणून राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
  • 2019 : चान्ग 4 ने चंद्राच्या दूरवर पहिले सॉफ्ट लँडिंग केले.
  • वरीलप्रमाणे 3 जानेवारी दिनविशेष 3 january dinvishesh

3 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 554 : ‘सुईको’ – जपानचे सम्राट यांचा जन्म.  (मृत्यू  : 15 एप्रिल 628)
  • 1760 : ‘वीरपदिया कट्टाबोम्मन’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक  यांचा जन्म.  (मृत्यू  : 16 ऑक्टोबर 1799)
  • 1831 : ‘सावित्रीबाई फुले’ – पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च1897)
  • 1873 : ‘इचिझो कोबायाशी’ – हँक्यु हानशिन होल्डिंग्सचे संस्थापक, जपानी उद्योगपती यांचा जन्म.  (मृत्यू  : 25 जानेवारी 1957)
  • 1883 : ‘क्लेमंट अ‍ॅटली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 8 आक्टोबर 1967)
  • 1921 : ‘चेतन आनंद’ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जुलै1997)
  • 1922 : ‘किरट बाबाणी’ – सिंधी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1931 : ‘डॉ. यशवंत दिनकर फडके’ – मराठी लेखक आणि इतिहास संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 2008)
  • 1938 : ‘मेजर जसवंत सिंग जासोल’ – भारताचे माजी अर्थमंत्री यांचा जन्म.  (मृत्यू  : 27 सप्टेंबर 2020)
  • वरीलप्रमाणे 3 जानेवारी दिनविशेष 3 january dinvishesh

3 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1903 : ‘अ‍ॅलॉइस हिटलर’ – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील यांचे निधन. (जन्म : 7 जून 1837)
  • 1975 : ‘ललित नारायण मिश्रा’ – भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 2 फेब्रुवारी 1923)
  • 1994 : ‘अमरेंद्र गाडगीळ’ – मराठी बालकुमार लेखक यांचे निधन.
  • 1998 : ‘प्रा. केशव विष्णू बेलसरे’ – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य यांचे निधन (जन्म : 8 फेब्रुवारी 1909)
  • 2000 : ‘सुशीला नायर’ – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1914)
  • 2002 : ‘सतीश धवन’ – भारीतय अंतराळ शास्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 सप्टेंबर 1920)
  • 2005 : ‘जे. एन. दिक्षित’ – भारतीय नेते यांचे निधन.
  • 1988 : ‘गॅस्टन आयस्केन्स’ – बेल्जियमचे अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी, बेल्जियमचे 47 वे पंतप्रधान (जन्म : 1 एप्रिल 1905)

3 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :

महिला मुक्ती दिन

महिला मुक्ती दिन हा 3 जानेवारी रोजी असतो, या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांना समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या स्वातंत्र्य, सन्मान, आणि अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

महिलांनी शिक्षण, रोजगार, राजकारण, आणि सामाजिक जीवनात समानतेसाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या निमित्ताने विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातात.

महिला मुक्ती म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर त्यांचे मानसिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यही यामध्ये समाविष्ट आहे. घरगुती हिंसाचार, लिंगभेद, शिक्षणाची टंचाई, आणि आर्थिक विषमता यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

महिला मुक्ती दिन आपल्याला समजावतो की महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

3 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 3 जानेवारी रोजी महिला मुक्ती दिन असतो.
3 जानेवारी दिनविशेष
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज