10 जानेवारी दिनविशेष
10 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

10 जानेवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस

10 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1730 : पुण्यातील शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू झाले
  • 1806 : केपटाऊनमध्ये स्थायिक झालेल्या डच वसाहतींनी ब्रिटीशांना आत्मसमर्पण केले.
  • 1863 : चार्ल्स पियर्सन यांनी डिझाइन केलेले 7 किमी लांब आणि सात स्थानक भूमिगत रेल्वे लंडनमध्ये सुरू झाली.
  • 1870 : बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले
  • 1920 : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा करार अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
  • 1966 : भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
  • 1972 : पाकिस्तानमध्ये 9 महिने तुरुंगात घालवल्यानंतर शेख मुजीबूर रहमान नव्याने स्वतंत्र बांगलादेशचे अध्यक्ष म्हणून परतले.
  • 1990 : टाइम  आणि वॉर्नर कम्युनिकेशन्सच्या विलीनीकरणाद्वारे टाइम वॉर्नरची स्थापना झाली.
  • वरीलप्रमाणे 10 जानेवारी दिनविशेष 10 january dinvishesh

10 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1775 : ‘बाजीराव पेशवे (दुसरे)’ – यांचा जन्म. (मृत्यू : 28 जानेवारी 1851 – ब्रम्हावर्त)
  • 1896 : ‘दिनकर गंगाधर केळकर’ – वास्तुसंग्राहक यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1966)
  • 1900 : ‘मारोतराव सांबशिव कन्नमवार’ – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 नोव्हेंबर 1963)
  • 1901 : ‘डॉ. गणेश हरी खरे’ – इतिहास संशोधक यांचा जन्म.
  • 1916 : ‘सुने बर्गस्ट्रोम’ – नोबेल पुरस्कार विजेते स्वीडिश बायोकेमिस्ट यांचा जन्म. (मृत्यू  : 15 ऑगस्ट 2004)
  • 1919 : ‘श्री. र. भिडे’ – संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक यांचा जन्म.
  • 1930 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू  : 4 जून 2020)
  • 1934 : ‘लिओनिड क्रावचुक’ – युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू  : 10 मे 2022)
  • 1937 : ‘मुरली देवरा’  भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू  : 24 नोव्हेंबर 2014)
  • 1940 : ‘के. जे. येसूदास’ – पार्श्वगायक व संगीतकार यांचा जन्म.
  • 1945 : ‘जॉन मेसन’ – भारतीय शिक्षणतज्ञ यांचा जन्म (मृत्यू  : 17 फेब्रुवारी 2023)
  • 1950 : ‘नाजुबाई गावित’ – आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया यांचा जन्म.
  • 1974 : ‘ह्रितिक रोषन’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 10 जानेवारी दिनविशेष 10 january dinvishesh

10 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 1760 : ‘रणवीर दत्ताजी शिंदे’ – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील यांचे निधन.
  • 1778 : ‘कार्ल लिनिअस’ – स्वीडीश वनस्पतीतज्ञ यांचे निधन. (जन्म : 23 मे 1707)
  • 1999 : ‘आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर’ – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत यांचे निधन.
  • 2002 : ‘पं. चिंतामणी रघुनाथ व्यास’ – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1924)
  • 2017 : ‘रोमन हर्झोग’ – जर्मनी देशाचे 7वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म : 5 एप्रिल 1934)
  • 1997 : ‘अलेक्झांडर आर. टॉड’ – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश बायोकेमिस्ट (जन्म : 2 ऑक्टोबर 1907)
  • 1994 : ‘गिरिजाकुमार माथूर’ – हिंदी कवी (जन्म : 22 ऑगस्ट 1919)
  • 1957 : ‘गॅब्रिएला मिस्त्राल’ – चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म : 7 एप्रिल 1889)

10 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :

आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस

आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 1975 साली पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते. त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असून ती जगभरात लोकप्रिय आहे. भारतीय राज्यघटनेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो.

या दिवशी जगभरातील भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक संस्थांद्वारे हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस आपल्याला हिंदी भाषेच्या संवर्धनाचे आणि प्रचाराचे महत्त्व पटवून देतो. या दिवसाच्या निमित्ताने भाषेच्या जागतिक ओळखीला बळकटी मिळते आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढतो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

10 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 10 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस असतो.
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज