6 जानेवारी दिनविशेष
6 january dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- पत्रकार दिन
- जागतिक युद्ध अनाथ दिन
6 जानेवारी दिनविशेष - घटना :
- 1673 : कोंडाजी फर्जदने केवळ 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.
- 1832 : पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक ‘दर्पण’ सुरू केले.
- 1838 : सॅम्युअल मोर्स यांनी टेलीग्राफचा शोध लावला.
- 1907 : मारिया माँटेसरीने पहिली माँटेसरी शाळा सुरू केली. तिच्या शाळांनी पूर्व प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणला.
- 1912 : न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47 वे राज्य बनले.
- 1924 : स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकारणात भाग घेणार नाही आणि रत्नागिरी जिल्ह्यात राहतील या अटीवर जन्मठेपेतून मुक्त करण्यात आले.
- 1929 : गरीब आणि आजारी लोकांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा कोलकाता येथे आल्या.
- वरीलप्रमाणे 6 जानेवारी दिनविशेष 6 january dinvishesh
6 जानेवारी दिनविशेष - जन्म :
- 1745 : ‘जाक्कास एलियन माँटगोल्फिएर’ – बलूनच्या सहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणारे वैज्ञानिक यांचा जन्म.
- 1812 : ‘बाळशास्त्री जांभेकर’ – मराठी पत्रकारितेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 1846)
- 1822 : ‘हेन्रीचा श्लीमन’ – उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या यांचा जन्म.
- 1868 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 1962)
- 1883 : ‘खलील जिब्रान’ – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 1931)
- 1925 : ‘जॉन डेलोरेअन’ – डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2005)
- 1927 : ‘रमेश मंत्री’ – वर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 1997)
- 1928 : ‘विजय तेंडुलकर’ – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 2008 – पुणे, महाराष्ट्र)
- 1931 : ‘डॉ. आर. डी. देशपांडे’ – पर्यावरण शास्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे अध्यक्ष यांचा जन्म.
- 1955 : ‘रोवान अॅटकिन्सन’ – विनोदी अभिनेते व पटकथालेखक यांचा जन्म.
- 1959 : ‘कपिलदेव’ – भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री यांचा जन्म.
- 1966 : ‘ए. आर. रहमान’ – सुप्रसिद्ध संगीतकार यांचा जन्म.
- 1984 : ‘दिलजीत दोसांझ’ – भारतीय गायक, गीतकार, अभिनेता यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 6 जानेवारी दिनविशेष 6 january dinvishesh
6 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :
- 1796 : ‘जिवबा दादा बक्षी’ – महादजी शिंदे यांचे सेनापती यांचे निधन.
- 1847 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचे निधन. (जन्म : 4 मे 1767)
- 1852 : ‘लुई ब्रेल’ – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1809)
- 1884 : ‘ग्रेगोर मेंडेल’ – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 जुलै 1822)
- 1885 : ‘भारतेंदू हरीश्चंद’ – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1850)
- 1918 : ‘जी. कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1845)
- 1919 : ‘थिओडोर रूझवेल्ट’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 27 ऑक्टोबर 1858)
- 1939 : ‘गुस्ताव झेमगल्स’ – लॅटव्हिय देशाचे 2रे अध्यक्ष, राजकारणी यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1871)
- 1947 : ‘मारिया शिकलग्रुबर’ – अॅलोइस हिटलरच्या आई आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आजी यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1795)
- 1968 : ‘कार्ल कोबेल्ट’ – स्विस कॉन्फेडरेशनचे 52वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1891)
- 1971 : ‘पी. सी. सरकार’ – जादूगार यांचे निधन. (जन्म : 23 फेब्रुवारी 1913)
- 1981 : ‘ए. जे. क्रोनिन’ – स्कॉटिश लेखक यांचे निधन. (जन्म : 19 जुलै 1896)
6 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :
पत्रकार दिन
पत्रकार दिन हा दरवर्षी 6 जानेवारी रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ चे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकर यांना “मराठी पत्रकारितेचे जनक” मानले जाते. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचे कार्य केले. पत्रकार दिन हा पत्रकारांच्या अथक प्रयत्नांना सन्मान देणारा दिवस आहे.
पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ मानले जातात. ते समाजातील समस्या उघडकीस आणून जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजातील विविध घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाला आदर व्यक्त केला जातो.
पत्रकार दिन आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देतो. सत्य, निष्ठा, आणि पारदर्शकतेची मूल्ये जपणे हा पत्रकारांचा मुख्य उद्देश असतो.
जागतिक युद्ध अनाथ दिन
जागतिक युद्ध अनाथ दिन दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांचे दुःख, त्यांची परिस्थिती, आणि त्यांना आधार देण्यासाठी आवश्यक उपायांवर जागरूकता निर्माण करणे आहे.
युद्धाच्या कठीण परिस्थितीत अनेक मुलांचे पालक गमावले जातात, ज्यामुळे त्यांचे बालपण संकटात येते. शिक्षण, आरोग्य, आणि सुरक्षिततेच्या सुविधांपासून वंचित राहणाऱ्या या मुलांना भविष्याचा आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
हा दिवस आंतरराष्ट्रीय संघटना, स्वयंसेवी संस्थां, आणि सरकारांना युद्ध अनाथांसाठी विशेष योजना आखण्याची प्रेरणा देतो. त्यांना शिक्षण, आरोग्यसेवा, आणि मानसिक आधार देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जागतिक युद्ध अनाथ दिन आपल्याला मानवतेचा संदेश देतो. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यांना प्रेम, सुरक्षितता, आणि संधी मिळाल्यास तेही समाजाचा महत्त्वाचा भाग बनू शकतात.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
6 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
- 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन असतो.
- 6 जानेवारी रोजी जागतिक युद्ध अनाथ दिन असतो.