28 जानेवारी दिनविशेष
28 january dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

28 जानेवारी दिनविशेष

जागतिक दिन :

  • माहिती संरक्षण दिन

28 जानेवारी दिनविशेष - घटना :

  • 1646: मराठी राज्याच्या राजमुद्रेचा वापर करून लिहिलेले शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
  • 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने शांघाय शहराचा ताबा घेतला.
  • 1961: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी, भारतातील पहिला घड्याळ कारखाना, बंगळुरूमध्ये उघडण्यात आला.
  • 1977: मिर्झा हमीदुल्लाह बेग यांनी भारताचे 15 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1986: चॅलेंजर स्पेस शटलचा उड्डाणानंतर 74 सेकंदात स्फोट झाला. ज्यामध्ये सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • वरीलप्रमाणे 28 जानेवारी दिनविशेष 28 january dinvishesh

28 जानेवारी दिनविशेष - जन्म :

  • 1457: ‘हेन्‍री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1509)
  • 1865: ‘लाला लजपतराय’ – स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1928)
  • 1877: ‘पुलिन बिहारी दास’ – बंगाली क्रांतिकारक यांचा जन्म.  
  • 1899: ‘के. एम. करिअप्पा’ – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 15 मे 1993)
  • 1925: ‘डॉ. राजा रामण्णा’ – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 2004)
  • 1930: ‘पं. जसराज’ – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म.
  • 1932: ‘पृथीपाल सिंह’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
  • 1937: ‘सुमन शंकर हेमाडी’ – चित्रपट व भावगीत गायिका यांचा जन्म.
  • 1955: ‘निकोलस सारकोझी’ – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1986: ‘श्रुती हासन’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 28 जानेवारी दिनविशेष 28 january dinvishesh

28 जानेवारी दिनविशेष - मृत्यू :

  • 814: ‘शार्लेमेन’ – फ्रँकिश राजा यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 747)
  • 1547: ‘हेन्‍री (आठवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जून 1491)
  • 1596: ‘फ्रान्सिस ड्रेक’ – एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्रजी एक्सप्लोरर यांचे निधन.
  • 1616: ‘संत दासोपंत’ – समाधिस्थ झाले. (जन्म: 24 सप्टेंबर 1551)
  • 1851: ‘बाजीराव पेशवे (दुसरे)’ – यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1775)
  • 1984: ‘सोहराब मेहेरबानजी मोदी’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1897)
  • 1996: ‘बर्न होगार्थ’ – अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1911)
  • 1997: ‘डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 जुलै 1911)
  • 2007: ‘ओंकार प्रसाद नय्यर’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1926)

28 जानेवारी दिनविशेष - जागतिक दिन लेख :

माहिती संरक्षण दिन

माहिती संरक्षण दिन दरवर्षी 28 जानेवारीला साजरा केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या व्यापक वापरामुळे आपली खाजगी माहिती विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर साठवली जाते. त्यामुळे डेटा चोरी आणि गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता वाढते.

हा दिवस लोकांमध्ये त्यांच्या डिजिटल हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. सुरक्षित पासवर्ड वापरणे, महत्त्वाच्या गोष्टींसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे, सार्वजनिक वाय-फायचा काळजीपूर्वक वापर करणे यांसारख्या उपाययोजना यासाठी उपयुक्त ठरतात.

माहिती संरक्षण दिन आपल्या डिजिटल हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रेरित करतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या माहितीचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. डेटा सुरक्षित ठेवणे म्हणजेच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचे रक्षण करणे होय.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

28 जानेवारी रोजी जागतिक दिन कोणते ?
  • 28 जानेवारी रोजी माहिती संरक्षण दिन असतो.
जानेवारी दिनविशेष
सोमंबुगुशु
   1234
567891011
12131415161718
19202122232425
262728 2930 31  
सोशल मिडिया लिंक
Prashant Patil Ahirrao

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज