10 मे दिनविशेष

10 मे दिनविशेष 10 may dinvishesh

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

10 मे जागतिक दिन :

10 may dinvishesh
  • महासागर दिवस Mother Ocean Day
  • राष्ट्रीय लघु व्यवसाय दिवस National Small Business Day
10 मे दिनविशेष

10 मे दिनविशेष 10 may dinvishesh

10 मे दिनविशेष - घटना :

  • 1818 : रायगड किल्ला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तह झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • 1824 : लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.
  • 1857 : भारताचे पहिले स्वतंत्रता संग्राम झाले.
  • 1877 : रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
  • 1907 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
  • 1937 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्सवर हल्ला केला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि विन्स्टन चर्चिल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले.
  • 1962 : मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्कचा पहिला अंक प्रकाशित केला.
  • 1979 : मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
  • 1981 : भारतात प्रथमच मुंबईत रात्रीचा क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
  • 1981 : फ्रँकोइस मिटरँड फ्रान्सचे अध्यक्ष झाले.
  • 1993 : संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • 1994 : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली.
  • 1997 : इराणमध्ये 7.3 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपात सुमारे 1,567 लोकांचा मृत्यू झाला, 2,300 लोक जखमी झाले आणि 50,000 लोक बेघर झाले.
  • 2002 : घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी, 120 ठार.
  • 2013 : वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच इमारत (त्या काळातील) बनली.
  • 10 मे दिनविशेष 10 may dinvishesh

10 मे दिनविशेष - जन्म :

  • 1265 : ‘फुशिमी’ – जपानचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 1317)
  • 1855 : ‘युकतेश्वर गिरी’ – भारतीय गुरु आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1936)
  • 1889 : ‘नारायण दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1905 : ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1978)
  • 1909 : ‘बेल्लारी शामण्णा केशवन’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 2000)
  • 1914 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 21 सप्टेंबर 1992)
  • 1918 : ‘रामेश्वरनाथ काओ’ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 2002)
  • 1927 : ‘नयनतारा सहगल’ – भारतीय लेखिका यांचा जन्म.
  • 1931 : ‘जगदीश खेबूडकर’ – ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म.
  • 1940 : ‘माणिकराव गोडघाटे’ ऊर्फ ग्रेस – प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2012)
  • 1986 : ‘पेंड्याला हरिकृष्ण’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.

10 मे दिनविशेष - मृत्यू :

  • 1774 : ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1710)
  • 1899 : ‘महादेव विनायक रानडे’ – रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल यांना फाशी.
  • 1981 : विमादि तथा ‘विनायक माधव दीक्षित’ – विनोदी लेखक प्राध्यापक पटवर्धन यांचे निधन.
  • 1998 : ‘यदुनाथ दत्तात्रय थत्ते’ – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 2000 : ‘नागोराव घन:श्याम’ तथा ‘ना. घ. देशपांडे’ – कवी यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1909)
  • 2001 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1934)
  • 2002 : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 14 जानेवारी 1919)
  • 2015 : ‘निनाद बेडेकर’ – भारतीय इतिहासकार, लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1949)

10 मे दिनविशेष 10 may dinvishesh

महासागर दिवस Mother Ocean Day

पाणी हे मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. खरं तर, सर्वसाधारणपणे मानवजातीला ज्ञात असलेल्या जीवनाच्या सर्व प्रकारांसाठी हे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय जगू शकणाऱ्या कोणत्याही ज्ञात प्रजाती नाहीत. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

आपल्या ग्रहाच्या सर्व महासागरांमध्ये किती प्रकारचे प्राणी राहतात याबद्दल सागरी जीवशास्त्रज्ञांना खात्री नसली तरी, पृथ्वीच्या सर्व प्रजातींपैकी एक चतुर्थांश प्राणी महासागरात राहतात असा अंदाज आहे. आपल्या सभ्यतेसाठी महासागर किती महत्त्वाचे आहेत हे सांगायला नको! ज्यामुळे अनेकदा आश्चर्यकारक शोध आणि आपल्या ज्ञानात सामान्य वाढ झाली. महासागराने अश्या प्रकारे जैवविविधता जपली आहे.

या सर्व कारणांमुळे आणि इतर अनेक कारणांमुळे, मदर ओशन डे हा आपल्या महासागरांचा त्यांच्या सर्व वैभव आणि संकटात दीर्घकाळापासून साजरा केला जाणारा उत्सव आहे.