2 मे दिनविशेष

2 मे दिनविशेष 2 may dinvishesh

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

2 मे दिनविशेष

2 मे दिनविशेष - जागतिक दिवस :

  • राष्ट्रीय भाऊ आणि बहिण दिन National Brothers And Sister Day
  • राष्ट्रीय जीवन विमा दिवस National Life Insurance Day
  • जागतिक पासवर्ड दिवस World Password Day
2 may dinvishesh

2 मे दिनविशेष 2 may dinvishesh

2 मे दिनविशेष - घटना :

  • 1908 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
  • 1918 : जनरल मोटर्सने शेवरलेट मोटर कंपनी विकत घेतली.
  • 1921 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव आणि तात्याराव यांना अंदमानातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले.
  • 1994 : बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण.
  • 1994 : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहण्याचा विक्रम केला.
  • 1997 : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1997 : पुण्याच्या अभिजित कुंटेने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपदाचे निकष पूर्ण केले.
  • 1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
  • 1999 : मीरा मॉस्कोसो पनामाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
  • 2004 : एस. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे नेव्ही सील 6 ने ठार मारले.
  • 2012 : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 दशलक्षमध्ये विकले गेले. हा नवा विश्वविक्रम ठरला.

2 मे दिनविशेष - जन्म :

  • 1899 : ‘भालजी पेंढारकर’ – मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1994)
  • 1920 : ‘डॉ. वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1983)
  • 1921 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1992)
  • 1929 : ‘जिग्मे दोरजी वांगचुकयांचा’ – भूतानचे राजे जन्म. (मृत्यू: 21 जुलै 1972)
  • 1969 : ‘ब्रायन लारा’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘अहटी हेनला’ – स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते यांचा जन्म.

2 मे दिनविशेष - मृत्यू :

  • 1519 : ‘लिओनार्डो दा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1452)
  • 1683 : ‘रघुनाथ नारायण हणमंते’ तथा रघुनाथपंडित शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी यांचे निधन.
  • 1963 : ‘डॉ. के. बी. लेले’ – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1882)
  • 1973 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 8 जून 1910)
  • 1975 : ‘शांताराम आठवले’ – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1910)
  • 1998 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य यांचे निधन. (जन्म: 18 मे 1913)
  • 1999 : ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
  • 2011 : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन ला अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: 10 मार्च 1957)

2 मे दिनविशेष 2 may dinvishesh

राष्ट्रीय भाऊ आणि बहिण दिन National Brothers And Sister Day

आजचा दिवस त्या लोकांना समर्पित आहे ज्यांनी तुमचे बालपण अविस्मरणीय बनवले होते — तुमच्या भावंडांना. चांगल्या काळात ते तुमच्यासाठी तुमच्या जवळ होते, आणि त्यांनी वाईट दिवसात हि ज्यांनी तुमची साथ सोडली नाही. अर्थात, असे काही वेळा असतील जेव्हा तुम्ही एकमेकांना बघू शकत नसाल. कोणते भावंड भांडणात पडत नाहीत? तरीही, हा 2 मे हा सर्वोत्तम दिवस राष्ट्रीय बंधू आणि भगिनी दिन साजरी करण्याचा दिवस आहे.

जागतिक पासवर्ड दिवस World Password Day

ते विचित्र आहेत, ते जटिल आहेत, ते सर्वत्र आहेत आणि आम्ही त्यांना त्यापेक्षा कितीतरी जास्त विसरतो. नाही, आम्ही वर्धापनदिनांबद्दल बोलत नाही आम्ही तुमच्या पासवर्डबद्दल बोलत आहोत! आपण त्यांचा वापर आपल्या जीवनातील सर्वात खाजगी भाग सुरक्षित करण्यासाठी आणि आमच्या आर्थिक, आमच्या आरोग्य नोंदी किंवा कदाचित आमच्या ईमेलचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी करत असतो. ‘जागतिक पासवर्ड दिवस’ आम्हाला या छोट्या क्रिप्टो-कीजचे महत्त्व आणि आम्ही आमचे जीवन राखून ठेवत आहोत याची खात्री करण्यासाठी ते बजावत असलेल्या भूमिकेची आठवण करून देतात.