25 नोव्हेंबर दिनविशेष
25 november dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन
25 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :
- 1664 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली.
- 1922 : फ्रेडरिक बँटिंग यांनी मधुमेहासाठी इन्सुलिनचा शोध जाहीर केला.
- 1948 : नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
- 1975 : सुरीनामला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1981 : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
- 1991 : कमल नारायण सिंह यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1994 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, कलकत्ता तर्फे राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1999 : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2000 : सितार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन सन्मान प्रदान केला.
- वरीलप्रमाणे 25 नोव्हेंबर दिनविशेष 25 november dinvishesh
25 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :
- 1841 : ‘आर्न्स्ट श्रोडर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म.
- 1844 : ‘कार्ल बेंझ’ – मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1929)
- 1872 : ‘कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर’ – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑगस्ट 1948)
- 1889 : ‘साधू वासवानी’ – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1966)
- 1882 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – मराठी चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 मे 1968)
- 1898 : ‘देबाकी बोस’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1921 : ‘भालचंद्र पेंढारकर’ – नटवर्य यांचा जन्म.
- 1926 : ‘रंगनाथ मिश्रा’ – भारताचे 21 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 2012)
- 1935 : ‘गोविंद सावंत’ – महाराष्ट्रीय हॉकीपटू यांचा जन्म.
- 1937 : ‘साधू वासवानी’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
- 1939 : ‘उस्ताद रईस खान’ – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक यांचा जन्म.
- 1952 : ‘इम्रान खान’ – पाकिस्तानचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1972 : ‘दीपा मराठे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1983 : ‘झुलन गोस्वामी’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 25 नोव्हेंबर दिनविशेष 25 november dinvishesh
25 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1885 : ‘अल्फान्सो (बारावा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1857)
- 1922 : ‘पांडुरंग दामोदर गुणे’ – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 मे 1884)
- 1960 : ‘अनंत सदाशिव अळतेकर’ – प्राच्यविद्यापंडित यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1898)
- 1962 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – आधुनिक संतकवी यांचे निधन. (जन्म : 6 जानेवारी 1868)
- 1974 : ‘उ. थांट’ – संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1909)
- 1984 : ‘यशवंतराव चव्हाण’ – भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 12 मार्च 1913)
- 1997 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचे निधन.
- 1997 : ‘हेस्टिंग्ज बांदा’ – मलावी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 14 मे 1898)
- 1998 : ‘परमेश्वर नारायण हक्सर’ – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 सप्टेंबर 1913 – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
- 2013 : ‘लीला पोतदार’ – बालसाहित्यिका यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1920)
- 2014 : ‘सितारा देवी’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1920)
- 2016 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 13 ऑगस्ट 1926)
25 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन
महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन (International Day for the Elimination of Violence Against Women) दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक अत्याचारांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा अंत करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी साजरा केला जातो.
महिलांविरुद्ध हिंसाचार ही जागतिक समस्या आहे, जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नुकसान पोहोचवत नाही, तर समाजाच्या प्रगतीलाही अडथळा ठरते. घरगुती हिंसा, मानवी तस्करी, लैंगिक शोषण, आणि वांशिक भेदभाव यांसारख्या समस्यांमुळे महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जातात.
या दिवशी विविध सामाजिक संघटना, शाळा, आणि सरकारी संस्था जनजागृती मोहीम, चर्चासत्रे, आणि कार्यशाळांचे आयोजन करतात. महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, कायद्यांची माहिती, आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात.
हिंसाचारमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने महिलांचा सन्मान राखणे, समानता प्रस्थापित करणे, आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 25 नोव्हेंबर रोजी महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन असतो.