5 नोव्हेंबर दिनविशेष
5 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

5 नोव्हेंबर दिनविशेष

जागतिक दिन :

  • जागतिक त्सुनामी जागरूकता दिन

5 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1896 : पुण्यात डेक्कन सभेची स्थापना झाली
  • 1918 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया आणि हंगेरीने, इटलीला शरणागती पत्करली.
  • 1921 : जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
  • 1922 : प्रसिद्ध पिरॅमिडमधील राजा तुतनखामेनच्या समाधीचे मुख्य प्रवेशद्वार शोधण्यात यश.
  • 1948 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेने संविधानाचा मसुदा सादर केला.
  • 1980 : रोनाल्ड रेगन हे विद्यमान जिमी कार्टर यांचा पराभव करून अमेरिकेचे 40 वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • 1996 : डॉ. श्रीराम लागू आणि सत्यदेव दुबे यांना कला गौरव प्रतिष्ठानतर्फे नाट्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2000 : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.
  • 2001 : हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोनचा प्रीमियर लंडनमध्ये झाला.
  • 2008 : बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
  • वरीलप्रमाणे 5 नोव्हेंबर दिनविशेष 5 november dinvishesh

5 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1618 : ‘औरंगजेब’ – मुघल सम्राट याचा जन्म. (मृत्यू : 3 मार्च 1707)
  • 1845 : ‘वासुदेव बळवंत फडके’ – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883)
  • 1871 : ‘शरदचंद्र रॉय’ – मानववंशशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1884 : ‘जमनालाल बजाज’ – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 फेब्रुवारी 1942)
  • 1884 : ‘हॅरी फर्ग्युसन’ – ट्रॅक्टरचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 1960)
  • 1894 : ‘अप्पासाहेब पटवर्धन’ – कोकणचे गांधी यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1971)
  • 1897 : ‘जानकी अम्माल’ – भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 1984)
  • 1916 : ‘रुथ हँडलर’ – बार्बी बाहुलीच्या निर्मात्या यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 2002)
  • 1925 : ‘ऋत्विक घटक’ – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 6 फेब्रुवारी 1976)
  • 1929 : ‘जयकिशन डाह्याभाई पांचाळ’ – शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1971)
  • 1929 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 2013)
  • 1930 : ‘रंजीत रॉय चौधरी’ – भारतीय औषधीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 2015)
  • 1934 : ‘विजया मेहता’ – दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1945 : ‘गोपाळकृष्ण गांधी’ – भारतीय नागरी सेवक आणि मुत्सद्दी यांचा जन्म.
  • 1945 : ‘एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन’ – तेलंगणाचे आणि आंध्र प्रदेशचे पहिले राज्यपाल यांचा जन्म.
  • 1950 : ‘निग पॉवेल’ – व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1955 : ‘अल्हाज मौलाना घोसी शाह’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म.
  • 1965: ‘मिलिंद सोमण’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘तब्बू’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1986 : ‘सुहास गोपीनाथ’ – भारतीय उद्योजक यांचा जन्म.
  • वरीलप्रमाणे 5 नोव्हेंबर दिनविशेष 5 november dinvishesh

5 नोव्हेंबर दिनविशेष
5 November dinvishesh
मृत्यू :

  • 1970 : ‘पं. शंभू महाराज’ – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक यांचे निधन.
  • 1991 : ‘पुरुषोत्तम विश्वनाथ बापट’ – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 जून 1894)
  • 1992 : ‘जॉर्ज क्लाईन’ – मोटर-व्हीलचेअरचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1904)
  • 1995 : ‘यित्झॅक राबिन’ – इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 1 मार्च 1922)
  • 1998 : ‘नागार्जुन’ – हिंदी कवी यांचे निधन.
  • 1999 : ‘माल्कम मार्शल’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 18 एप्रिल 1958)
  • 2005 : ‘स. मा. गर्गे’ – इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार यांचे पुणे येथे निधन झाले.
  • 2011 : ‘दिलीप परदेशी’ – नाटककार व साहित्यिक यांचे निधन.

5 नोव्हेंबर दिनविशेष
5 November dinvishesh
जागतिक दिन लेख :

5 November dinvishesh
पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस

जागतिक त्सुनामी जागरूकता दिन (World Tsunami Awareness Day) दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट त्सुनामीसारख्या प्रलयकारी नैसर्गिक आपत्तीविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणे आहे. त्सुनामी ही भूगर्भीय हालचालींमुळे समुद्राच्या पातळीत होणारी अनपेक्षित मोठी लाट आहे, जी किनारी भागांना मोठे नुकसान पोहोचवते.

या दिवसाचे मूळ 1854 साली जपानमध्ये झालेल्या एका घटनेत आहे, जेव्हा एका शेतकऱ्याने जमिनीवरची पिके जाळून गावकऱ्यांचे लक्ष वेधले आणि त्यांना त्सुनामीच्या धोका समजून दिला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

त्सुनामीपासून होणाऱ्या धोका कमी करण्यासाठी किनारी भागातील रहिवाशांना सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच तातडीच्या उपाययोजनांसाठी जागतिक स्तरावर सहकार्य केले जाते. जागतिक त्सुनामी जागरूकता दिन आपल्याला या नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांपासून सुरक्षित राहण्याचे आणि योग्य ती तयारी करण्याचे महत्त्व पटवून देतो, जेणेकरून मानवी जीवितहानी टाळता येईल.

5 November dinvishesh
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

5 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?

  • 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिन असतो.
नोव्हेंबर दिनविशेष
सोमंबुगुशु
     12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
सोशल मिडिया लिंक

प्रशांत पाटील (अहिरराव)
गाव: कमखेडे

इतर पेज