5 मे दिनविशेष

5 मे दिनविशेष 5 may dinvishesh

जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू

5 मे दिनविशेष - जागतिक दिवस :

5 may dinvishesh
  • राष्ट्रीय अंतराळवीर दिन National Astronaut Day

5 मे दिनविशेष 5 may dinvishesh

5 मे दिनविशेष - घटना :

  • 1260 : कुबलाई खान मंगोलियाचा सम्राट झाला.
  • 1640 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
  • 1646 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • 1835 : युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
  • 1901: पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 1905 : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
  • 1936 : इटालियन सैन्याने इथिओपियन शहर अदीसाबाबा ताब्यात घेतले.
  • 1955 : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व मिळाले.
  • 1964 : युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिवस म्हणून घोषित केला.
  • 1997 : जयदीप आमरे साडेपाच वर्षाच्या मुलाने पोहूण गोव्यात मांडवी नदी पार केली.
  • 1999 : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वात जुने लिखित अवशेष सापडले.
  • 2021 : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीचा अंत जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला.

5 मे दिनविशेष - जन्म :

  • 1479 : ‘गुरू अमर दास’ – शिखांचे तिसरे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1574)
  • 1818 : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1883)
  • 1864 : ‘निले ब्लाय’ उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
  • 1911 : ‘प्रितलाता वडेदार’ – भारतीय शिक्षक व कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1932)
  • 1916 : ‘ग्यानी झॆलसिंग’ – भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1994)
  • 1989: ‘लक्ष्मी राय’ – तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

5 मे दिनविशेष - मृत्यू :

  • 1821 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1769)
  • 1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1890)
  • 1943 : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे – यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1872)
  • 1945 : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
  • 1989 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1904)
  • 2006 : ‘नौशाद अली’ – ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
  • 2007 : ‘थिओडोर हेरॉल्ड मॅमन’ – लेसर चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1927)
  • 2008 : ‘इरब रोबिन्स’ – बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1917)
  • 2012 : ‘सुरेंद्रनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1937)
  • 2017 : ‘लीला सेठ’ – दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांचे निधन.

5 मे दिनविशेष 5 may dinvishesh

राष्ट्रीय अंतराळवीर दिन National Astronaut Day

ॲलन शेपर्ड या अमेरिकन व्यक्तीने पहिल्यांदा अंतराळात गेल्याच्या स्मरणार्थ 2016 पासून 5 मे रोजी राष्ट्रीय अंतराळवीर दिन साजरा केला जातो. पहिल्या-वहिल्या अंतराळ उड्डाणापासून एका महिलेच्या सर्वात लांब अंतराळ उड्डाणापर्यंत; आम्ही खूप पुढे आलो आहोत.

अंतराळ प्रवास आपल्यासोबत असंख्य साहस आणि शोध घेऊन येतो! आणि अवकाशात प्रवास करायला मिळणारे अंतराळवीर हे दुर्मिळ आणि विशेष प्रकारचे व्यक्ती आहेत. पृथ्वीच्या पलीकडे आणि अंतराळात प्रवास करून मानवासाठी काही सर्वात अनोखे अनुभव घेतलेल्या या लोकांना साजरा करण्यासाठी राष्ट्रीय अंतराळवीर दिनानिमित्त वेळ काढा!

थिओडोर हॅरोल्ड मैमन

थिओडोर हॅरोल्ड मैमन – एक अमेरिकन अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांना लेसरच्या शोधाचे श्रेय दिले जाते. मैमनच्या लेसरमुळे नंतर इतर अनेक प्रकारचे लेसर विकसित झाले. १६ मे १९६० रोजी लेसरचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

7 जुलै, 1960 रोजी मॅनहॅटन येथे पत्रकार परिषदेत मायमन आणि त्याचा नियोक्ता, ह्यूजेस एअरक्राफ्ट कंपनीने जगाला लेझरची घोषणा केली. मैमनला त्याच्या शोधासाठी पेटंट देण्यात आले, आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. पहिले लेसर विकसित करतानाचे त्यांचे अनुभव आणि त्यानंतरच्या संबंधित घटनांचे वर्णन त्यांच्या पुस्तक, द लेझर ओडिसी, मध्ये केले आहे, जे नंतर 2018 मध्ये The Laser Inventor: Memoirs of Theodore H. Maimon या नवीन शीर्षकासह प्रकाशित झाले.