4 मे दिनविशेष
4 मे दिनविशेष 4 may dinvishesh
जागतिक दिवस- घटना - जन्म - मृत्यू
4 मे दिनविशेष - जागतिक दिवस :
- आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस
4 मे दिनविशेष 4 may dinvishesh
4 मे दिनविशेष - घटना :
- 1799 : टिपू सुलतानचा इंग्रजांकडून श्रीरंगपट्टणाच्या युद्धात पराभव झाला.
- 1854 : भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
- 1904 : अमेरिकन लोकांनी पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- 1930 : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना ताब्यात घेऊन येरवडा तुरुंगात ठेवले.
- 1967 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिकच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
- 1979 : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- 1989: पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 30 टका जगा राखीव ठेवण्याची घोषणा केली.
- 1992 : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
- 1995 : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’चे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
- 1996 : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
4 मे दिनविशेष - जन्म :
- 1008 : ‘हेन्री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1060)
- 1649 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंड चे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1731)
- 1655 : ‘बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी’ – पियानोचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1731)
- 1767 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1847)
- 1825 : ‘थॉमास हक्सले’ – ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 1895)
- 1847 : धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1917)
- 1928 : इजिप्तचे 4थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
- 1929 : ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1993)
- 1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 2009)
- 1934 : भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
- 1940 : इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
- 1945 : ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
- 1984 : बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 2007)
4 मे दिनविशेष - मृत्यू :
- 1799 : ‘टिपू सुलतान’ – म्हैसूरचा वाघ यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: 20 नोव्हेंबर 1750)
- 1938 : ‘कानो जिगोरो’ – ज्युदोचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 28 ऑक्टोबर 1860)
- 1980 : आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.
- 1968 : बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
- 1980 : युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: 7 मे 1892)
- 1980 : सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1905)
- 2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1923)
- 4 मे दिनविशेष 4 may dinvishesh
4 मे दिनविशेष 4 may dinvishesh
अग्निशामक दिन
अग्निशामक होण्याचा अर्थ काय आहे हे कोणीही मांडू शकले नसते! आपल्यापैकी बहुतेकजण आपल्या प्रियजनांसाठी-कुटुंबातील सदस्य, मित्र, पाळीव प्राणी यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालतील. पण ज्याला तुम्ही अजिबात ओळखत नाही अशा व्यक्तीसाठी गंभीर दुखापत किंवा मृत्यूचा धोका पत्करण्याची तुम्ही कल्पना करू शकता का? एखाद्या अनोळखी व्यक्तीची सुटका करण्यासाठी जळत्या इमारतीत जाण्याची तुम्ही कल्पना करू शकता, हे माहीत असूनही तुम्ही बाहेर येणार नाही?
एका निराधार प्राण्याला वाचवण्यासाठी जळत्या जंगलात झाडावर चढण्याची तुम्ही कल्पना करू शकता का, जो स्वतःहून खाली येण्यास घाबरलेला आहे? या अशा गोष्टी आहेत ज्या अग्निशामक दररोज करतात, आणि आम्ही कदाचित त्यांना वीरता म्हणून पाहतो, अग्निशामकांसाठी, त्या फक्त कामाचा एक भाग आहेत. या वीर पुरुष आणि स्त्रिया त्यांचे कार्य अगदी चतुराइने आणि धाडसाने करतात, म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या सन्मानार्थ अग्निशामक दिन साजरा करण्याचे सुनिश्चित करूया!