23 मे दिनविशेष
23 may dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
23 मे दिनविशेष - घटना :
- 1568 : नेदरलँडचे स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1737: पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला पुन्हा बांधला.
- 1829: सिरील डेमियनला अॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
- 1911 : ‘न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी’ सामान्य लोकांसाठी उघडली.
- 1949: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- 1951: तिबेटच्या शांततापूर्ण मुक्तीसाठी तिबेटने चीनसोबत सतरा कलमी करारावर स्वाक्षरी केली.
- 1956: जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी विधेयक मंजूर.
- 1958 : अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर-1 बंद पडला
- 1984: बचेंद्री पाल यांनी दुपारी 1:09 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) एव्हरेस्ट शिखर सर केले.
- 1995: ‘जावा(JAVA)’ प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
- 1997: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणार्या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
- 2016 : भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने (ISRO) आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी (RLV-TD) ची स्थापना केली.
- 2023 : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा जगातील अव्वल दर्जाचा भालाफेक करणारा देशातील पहिला भालाफेकपटू ठरला आहे.
- 23 मे दिनविशेष 23 may dinvishesh
23 मे दिनविशेष - जागतिक दिन :
- जागतिक कासव दिन World Turtle Day
23 मे दिनविशेष - जन्म :
- 1052: ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 1108)
- 1707: ‘कार्ल लिनिअस’ – स्वीडीश वनस्पतीतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 जानेवारी 1778)
- 1875: ‘आल्फ्रेड पी. स्लोन’ – अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 17 फेब्रुवारी 1966)
- 1896: ‘केशवराव भोळे’ – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1977)
- 1918: ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1997)
- 1919: ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 2009)
- 1926: ‘पी. गोविंद पिल्लई’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते यांचा जन्म. (मृत्यू: 22 नोव्हेंबर 2012)
- 1926: ‘बॅसिल साळदादोर डिसोझा’ – भारतीय बिशप यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1996)
- 1933: ‘मोहन वेल्हाळ’ – मुद्रितशोधन तज्ञ यांचा जन्म.
- 1943: ‘कोवेलमूडी राघवेंद्र राव’ – पटकथालेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1945: ‘पद्मराजन’ – भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक यांचा जन्म.(मृत्यू: 24 जानेवारी 1991)
- 1951: ‘अनातोली कार्पोव्ह’ – रशियन बुद्धीबळपटू यांचा जन्म
- 1965: ‘वूर्केरी रमण’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 23 मे दिनविशेष 23 may dinvishesh
23 मे दिनविशेष - मृत्यू :
- 1857: ‘ऑगस्टिन कॉशी’ – फ्रेन्च गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1789)
- 1906: ‘हेन्रिक इब्सेन’ – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1828)
- 1937: ‘जॉन डेव्हिसन रॉकफेलर’ – रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 जुलै 1839)
- 1960: ‘जॉर्ज क्लोडे’ – निऑन लाईट चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1870)
- 2010 : ‘वेतुरी सुंदरम्मा मूर्ती’ – राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका यांचे निधन.
- 2014: ‘माधव मंत्री’ – भारतीय क्रिकेटर यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1921)
- 2014: ‘आनंद मोडक’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 मे 1951)
23 मे दिनविशेष - जागतिक दिन लेख :
जागतिक कासव दिन World Turtle Day
ससा आणि कासव हि बोधकथा आपल्यापैकी सर्वानीच ऐकली असेलच, यात आपण कासवापासून शिकलो कि आपण आपले काम योग्य पद्धतीने न थकता न थांबता केले तर आपण नक्कीच जिंकणार, तर कासव या लवचिक प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी आपण 23 मे रोजी जागतिक कासव दिन साजरा करतो. कासव आणि कासव बुद्धी आणि चिकाटीशी हा दिवस संबंधित आहेत. कासव हे सरपटणारे प्राणी आहेत जे जगभरातील अनेक वातावरणात आढळतात. हे प्राणी आपापल्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते इतर प्राण्यांचे वास्तव्य असलेले खड्डे खणतात आणि किनाऱ्यावर धुतलेल्या मेलेल्या माशांना खाऊन आपले किनारे स्वच्छ ठेवतात. ते पर्यावरणीय संतुलन राखतात आणि म्हणूनच, या सौम्य प्राण्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
इतर पेजेस
सोशल मिडिया लिंक
महत्वाचे साईटस