3 नोव्हेंबर दिनविशेष
3 november dinvishesh

जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू

3 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :

  • 1817 : कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक, बँक ऑफ मॉन्ट्रियलची स्थापना झाली.
  • 1838 : टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र मुंबईत प्रथम द बॉम्बे टाइम्स आणि जनरल ऑफ कॉमर्स म्हणून प्रकाशित झाले.
  • 1903 : पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
  • 1911 : शेवरलेटने अधिकृतपणे ‘फोर्ड मॉडेल टी’ च्या स्पर्धेत ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केला.
  • 1913 : युनायटेड स्टेट्समध्ये आयकर लागू झाला.
  • 1918 : पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
  • 1936 : फ्रँकलिन डी. रुझवेल्ट अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • 1944 : भारतीय संगीत संवर्धन मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषद आयोजित करण्यात आली.
  • 1946  : जपानचे संविधान सम्राटाच्या संमतीने स्वीकारले गेले.
  • 1957 : रशियाच्या स्पुटनिक-2 या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
  • 1988 : श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
  • 2014 : वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे उघडले.
  • वरीलप्रमाणे 3 नोव्हेंबर दिनविशेष 3 november dinvishesh

3 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :

  • 1688 : ‘सवाई जयसिंग (दुसरे)’ – अम्बर संस्थानचे राजा यांचा जन्म. (मृत्यू : 21 सप्टेंबर 1743)
  • 1900 : ‘एडॉल्फ डॅस्लर’ – अॅडिडास चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 सप्टेंबर 1978)
  • 1901 : ‘पृथ्वीराज कपूर’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1972)
  • 1917 : ‘अन्नपूर्णा महाराणा’ – भारतीय स्वतंत्रसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 2012)
  • 1921 : ‘चार्ल्स ब्रॉन्सन’ – अमेरिकन अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 2003)
  • 1925 : ‘डॉ. हे. वि. इनामदार’ – प्रबंधलेखक, संपादक यांचा जन्म.
  • 1933 : ‘मा. अमर्त्य सेन’ – नोबेल पुरस्कार प्रमाणित यांचा जन्म.
  • 1937 : ‘लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर’ – चित्रपटसृष्टीत लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 1998)
  • वरीलप्रमाणे 3 नोव्हेंबर दिनविशेष 3 november dinvishesh

3 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :

  • 1819 : ‘अनंत फांदी’ – शाहीर यांचे निधन.
  • 1890 : ‘ओरिचिक ओशेनेबेविन’ – स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 24 नोव्हेंबर 1811)
  • 1975 : ‘ताजुद्दीन अहमद’ – बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1925)
  • 1990 : ‘मनमोहन कृष्ण’ – लोकप्रिय चरित्र अभिनेते यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1922)
  • 1992 : ‘प्रेम नाथ’ – हिंदी अभिनेते यांचे निधन. (जन्म : 21 नोव्हेंबर 1926)
  • 1998 : ‘डॉ. आर. सी. हिरेमठ’ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1920)
  • 1998 : ‘बॉब केन’ – बॅटमॅन पत्राचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1915)
  • 2000 : ‘प्रा. गिरी देशिंगकर’ – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक यांचे निधन.
  • 2012 : ‘कैलाशपती मिश्रा’ – गुजरातचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 5 ऑक्टोबर 1923)