10 नोव्हेंबर दिनविशेष
10 november dinvishesh
जागतिक दिन-
घटना - जन्म - मृत्यू
जागतिक दिन :
- शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन
10 नोव्हेंबर दिनविशेष - घटना :
- 1659 : शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला.
- 1698 : ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाकडून कलकत्ता बंदर विकत घेतले.
- 1990 : चंद्रशेखर यांनी भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
- 1958 : गुजरातमधील बडोद्याजवळील वेदसर येथे प्रायोगिक विहिरीत तेलाचा शोध लागला.
- 1970 : लुना 17 : सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केलेले अनक्रूड स्पेस मिशन.
- 1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले.
- 1999 : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
- 2001 : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती.
- 2008 : मंगळावर उतरल्यानंतर पाच महिन्यांत, लँडरशी संपर्क तुटल्यानंतर नासाने फिनिक्स मिशन पूर्ण झाल्याचे घोषित केले.
- वरीलप्रमाणे 10 नोव्हेंबर दिनविशेष 10 november dinvishesh
10 नोव्हेंबर दिनविशेष - जन्म :
- 1810 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश शौचालय चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 1882)
- 1848 : ‘राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1925)
- 1851 : ‘फ्रान्सिस बाल्फोर’ – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 19 जुलै 1882)
- 1904 : ‘कुसुमावती देशपांडे’ – श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1961)
- 1919 : ‘मिखाईल कलाशनिको’ – एके 47 बंदुकीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2013)
- 1925 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1984)
- 1944 : ‘असगर अकयेव’ – किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
- 1952 : ‘सुनंदा बलरामन’ – सुप्रसिद्ध लेखिका यांचा जन्म.
- 1964 : ‘आशुतोष राणा’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1964 : ‘नीता अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
- वरीलप्रमाणे 10 नोव्हेंबर दिनविशेष 10 november dinvishesh
10 नोव्हेंबर दिनविशेष - मृत्यू :
- 1659 : ‘अफजलखान’ – विजापूरचा सरदार याचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
- 1920 : ‘दत्तोपंत ठेंगडी’ – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 2004)
- 1922 : ‘गणेश सखाराम खरे’ – शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद यांचे पुणे येथे निधन.
- 1938 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 19 मे 1881)
- 1941 : ‘ल. रा. पांगारकर’ – संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1872)
- 1982 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 19 डिसेंबर 1906)
- 1996 : ‘माणिक वर्मा’ – सुप्रसिद्ध गायिका यांचे निधन. (16 मे 1926)
- 2003 : ‘कन्नान बनान’ – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1936)
- 2006 : ‘नादराजा रविराज’ – तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य यांची कोलंबो येथे हत्या.
- 2009 : ‘सिंपल कपाडिया’ – अभिनेत्री यांचे निधन.(जन्म : 15 ऑगस्ट 1958)
- 2013 : ‘विजयदन देठा’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1926)
10 नोव्हेंबर दिनविशेष - जागतिक दिन लेख :
शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन
जागतिक विज्ञान दिन शांती आणि विकासासाठी (World Science Day for Peace and Development) दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे विज्ञानाचे मानवजातीच्या शांती आणि विकासासाठी असलेले योगदान अधोरेखित करणे, तसेच विज्ञानविषयक जनजागृती निर्माण करणे होय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जगात अनेक समस्या सोडवता आल्या आहेत, ज्यामध्ये पर्यावरणीय समस्या, आरोग्यविषयक समस्या, आणि ऊर्जा बचत यांचा समावेश होतो.
यादिवशी शाळा, महाविद्यालये, आणि शैक्षणिक संस्था विज्ञानविषयक कार्यशाळा, प्रदर्शनं, आणि चर्चासत्रांचे आयोजन करतात, ज्यातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजते आणि त्यांची संशोधनविषयक आवड वाढते.
विज्ञानाचा शांतीसाठी उपयोग कसा करता येईल आणि संशोधनाचा विकासासाठी कसा फायदा होईल यावर या दिवशी विशेष भर दिला जातो. जागतिक विज्ञान दिन आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समस्या सोडवण्यास प्रेरणा देतो आणि शाश्वत विकासासाठी विज्ञानाचा वापर कसा करावा हे शिकवतो, ज्यामुळे एक समृद्ध आणि सुरक्षित भवितव्य घडू शकते.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
10 नोव्हेंबर रोजी जागतिक दिन कोणते ?
- 10 नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन असतो.